भुजबळ पालकमंत्री झाले आणि नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली – प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असताना विरोधी पक्षातील भाजपने सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज नाशिकमध्ये बोलत असताना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यापासून नाशकात गुन्हेगारी वाढली आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून हे शहर पुन्हा गुन्हेगारांची नगरी होते की काय अशी भीती नागरिकांमध्ये असल्याचं दरेकर यांनी सांगितलं.

नाशिक शहरात काही दिवसांपूर्वीच भाजपच्या मंडल अध्यक्षाची हत्या करण्यात आली होती. युनियनच्या वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. यातील आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत असल्याचं बोललं जातंय. “आरोपी विनोद बर्वे याने लावलेल्या युनियनच्या बॅनरवर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो आहेत. काही दिवसांपूर्वी विनोद बर्वेने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्याचं हे उत्तम उदाहरण आहे. भुजबळ पालकमंत्री झाल्यानंतर शहरात गुन्हेगारी वाढली”, अशी घणाघाती टीका दरेकरांनी केली आहे.

हे वाचलं का?

… त्यावेळी लोकं हे सरकार फेकून देतील; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकार हल्लाबोल

या प्रकरणातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हायला हवी. जर आरोपी बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही अशी प्रतिक्रीया मयत अमोल ईघेच्या पत्नीने दिल्याचंही दरेकरांनी सांगितलं. विधानभवनात आपण हा मुद्दा लावून धरणार असून फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी केली जाणार असल्याचंही दरेकर म्हणाले. तसेच या प्रकरणात तथ्य असेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी दरेकरांनी केली.

ADVERTISEMENT

या प्रकरणातील आरोपी विनोद बर्वेचे भुजबळ यांच्यासोबत फोटो असल्याचंही दरेकरांनी यावेळी बोलताना सांगितलं. अजुनही भाजप कार्यकर्त्यांना तक्रार करु नका अशा धमक्या येत आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांनी निष्काळजीपणा केला आहे. आयुक्तांनी कोणाचंही नोकर असल्यासारखं काम करु नये. त्यांनी नाशिकमधली गुन्हेगारी मिटवावी. सत्ता येत जात असते, असं म्हणत दरेकरांनी पोलिसांच्याही कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT