Tauktae Cyclone: तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारी ‘दृश्य’ कॅमेऱ्यात कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: तौकताई चक्रीवादळ (Tauktae Cyclone) हे आता प्रचंड वेगाने पुढे सरसावत आहे. सध्या हे चक्रीवादळ हे सिंधुदुर्ग (Sindhudurga) जिल्ह्यातील समुद्रात प्रचंड वेगाने घोंघावत आहे. सध्या हे वादळ देवगड (Devgad) आणि मालवण तालुक्याच्या आसपास असल्याचं दिसून येत आहे. काल (15 मे) मध्यरात्री गोव्यात (Goa) पोहचलेल्या या चक्रीवादळाने संपूर्ण गोव्यात अक्षरश: हाहाकार उडवला आहे. येथील अनेक ठिकाणी मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडल्याचं यावेळी पाहायला मिळालं. दुसरीकडे आता हेच वादळ सिंधुदुर्गातील मालवण आणि परिसरात धुमाकूळ घालत आहेत.

या चक्रीवादळाची काही दृश्य (Videos) ‘मुंबई तक’ टीमने कैद केली आहेत ती आपल्याला इथे पाहता येतील. चक्रीवादळाची ही दृश्य अंगावर अक्षरश: काटा आणणारी आहेत. पाहा तौकताई चक्रीवादळाचा नेमका कसा प्रकोप झाला आहे.

कारवार – कर्नाटक (Karwar – Karnataka)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1. या वादळाचा प्रकोप काल (16 मे) सर्वात आधी हा कर्नाटकमधील किनारी भागात पाहायला मिळाला. यावेळी कर्नाटकमधील किनारपट्टी भागात असणाऱ्या अनेक गावाच्या आतापर्यंत समुद्राचं पाणी शिरलं होतं. याशिवाय प्रचंड वारा देखील सुटला होता.

Tauktae Cyclone: पाहा महाराष्ट्रात कोणत्या वेळी कुठे असणार चक्रीवादळ?

ADVERTISEMENT

गोवा: (Goa)

ADVERTISEMENT

1. आज पहाटेच्या सुमारास गोव्याच्या समुद्र किनारी भागात तौकताई वादळाने प्रवेश केला, पाहा त्यावेळची दृश्य.

Tauktae Cyclone Live: पुढील काही तास महत्त्वाचे, तौकताई चक्रीवादळाचं होणार ‘अत्यंत भीषण चक्रीवादळात’ रुपांतर

2. वादळामुळे गोव्यात अनेक ठिकाणी अत्यंत जोरदार वारे वाहत होते.

3. गोव्यात अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, अनेक घरांवरी पत्रे उडून गेले… यावेळी बऱ्याच ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने बरंच नुकसान देखील झालं आहे.

Tauktae Cyclone : मुंबईकरांनो घराबाहेर पडणं टाळा, महापालिकेकडून यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र (Sindhudurga – Maharashtra)

1. तौकताई चक्रीवादळ हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहचलं असून येथील समुद्र प्रचंड खवळलेला यावेळी पाहायला मिळाला.

2. तौकताई वादळाचा केंद्रबिंदू हा मालवण किनाऱ्यापासून प्रचंड जवळ असल्याने येथील समुद्रात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. याशिवाय मुसळधार पावसाच्या सरी देखील इथे बरसत आहेत.

Cyclone म्हणजे काय? त्यांना नावं नेमकी कशी दिली जातात?

3. तौकताई चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस मालवण आणि संपूर्ण सिंधुदुर्गात बरसत आहे. त्यामुळे येथील दृश्यमानता खूपच कमी झाली आहे.

4. गोव्याहून पुढे सरकलेलं तौकताई चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान वेगाने वारे वाहत असल्याचं पाहायला मिळालं.

Tauktae Cyclone: चक्रीवादळाने दिशा बदलली, पाकिस्तानवर धडकणारं वादळ आता महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने!

5. वादळी वारा आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे सिंधुदुर्गातील समुद्र प्रचंड खवळलेला पाहायला मिळत आहे.

रत्नागिरी – महाराष्ट्र (Ratnagiri – Maharashtra)

1. रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप वादळ पोहचलेलं नाही. पण तरीही येथे प्रचंड सोसाट्याचा वारा सुटलेला पाहायला मिळालं.

Tauktae Cyclone: मुंबईत Sea Link दोन दिवस बंद राहणार-महापौर

तौकताई चक्रीवादळ हे या क्षणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घोंघावत आहे. या चक्रीवादळचा केंद्रबिंदू हा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून फारच जवळच आहे. त्यामुळे येथे प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. याशिवाय मुसळधार पाऊस देखील बरसण्यास सुरुवात झाली आहे. पण आता या वादळाबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने थोड्या वेळापूर्वीच अशी माहिती दिली आहे की, तौकताई चक्रीवादळाचं रुपांतर हे आता पुढील काही तासांमध्ये ‘अत्यंत भीषण चक्रीवादळा’त होणार आहे.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घोंघावणारं तौकताई चक्रीवादळ हे तीव्र स्वरुपाचं आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक ताकद जमा करणार असल्याने त्याचं स्वरुप हे अती तीव्र प्रकारातील असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.

तौकताई Cyclone : मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी, महाराष्ट्रावर काय होणार परीणाम?

मुंबईत कधीपर्यंत पोहचणार तौकताई चक्रीवादळ?

तौकताई वादळ हे 17 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईच्या (Mumbai) आसपास पोहचणार आहे. त्यामुळे मुंबई आणि इतरच्या परिसरात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मात्र, या वादळाचा मुंबई आणि जवळच्या परिसराला फारसा फटका बसत नसल्याचं सध्या तरी दिसतं आहे. मुंबईची रचना ही खोबणीत आहे. त्यामुळे सहसा वादळ हे मुंबईवर धडकत नसल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. मात्र असं असलं तरीही प्रशासन या वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान तौकताई हे वादळ मुंबईहून पुढे सरकणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT