Madha Lok Sabha 2024 : शरद पवारांची अभिजीत पाटलांनी सोडली साथ, माढ्यात किती धोका?
Abhijeet Patil Support BJP, Madha Lok Sabha 2024 : देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिलासा देऊन कारखान्यास जीवनदान दिल्याने आम्ही कारखान्यासाठी हा निर्णय घेत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे अभिजीत पाटलांनी सांगितले. त्यामुळे शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
Abhijeet Patil Support BJP, Madha Lok Sabha 2024 : विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघातून भाजपला पाठिंबा जाहिर केला आहे. चारच दिवसापुर्वी अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अभिजीत पाटलांनी हा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे या कारवाईपुर्वी अभिजीत पाटील (Abhijeet Patil) शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार मोहिते पाटलांच्या (dhairyasheel mohite patil) सभेत दिसले होते. त्यानंतर आता अभिजीत पाटलांनी भाजपला पाठिंबा जाहिर केल्याने माढ्यात शरद पवारांना (Sharad pawar) नेमका किती धोका आहे ? हे जाणून घेऊयात. (madha lok sabha 2024 abhijeet patil support bjp devendra fanavis vitthal cooperative company sharad pawar dhairyasheel mohite patil vs ranjitsingh nimbalkar)
ADVERTISEMENT
माढा लोकसभा मतदार संघात भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरूद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी ताकद पणाला लावली आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या अभिजीत पाटलांना फडणवीसांनी गळाला लावले आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Election : महाराष्ट्रातील 9 खासदारांना झटका, तिकिटं का कापली?
खरं तर अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई केली होती. या कारवाईनंतर अभिजीत पाटील चिंतेत होते. अशावेळी पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीत फडणवीसांनी संकटातील कारखाना बाहेर काढण्यास मदत करू असा पाटलांना शब्द दिला. त्यानंतर अभिजित पाटलांनी हा निर्णय घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिलासा देऊन कारखान्यास जीवनदान दिल्याने आम्ही कारखान्यासाठी हा निर्णय घेत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे अभिजीत पाटलांनी सांगितले. त्यामुळे शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
दरम्यान अभिजीत पाटील यांनी पाठिंबा दिल्याचा भाजपला किती फायदा होणार आहे? हे पाहूयात. विठ्ठल कारखाना आणि विठ्ठल परिवारच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघातील एक मोठी ताकद म्हणून अभिजीत पाटील यांची ओळख आहे. अभिजीत पाटील यांचा एक कारखाना सांगोला येथे असल्याने माढा लोकसभा मतदार संघात खूप मोठी मतांची ताकद भाजपला होणार आहे.इतकचं नाही तर पंढरपूर आणि मंगळवेढ्यात असलेले पाटील यांचे कार्यकर्ते राम सातपूते यांचा प्रचार करणार आहे. त्यामुळे माढा आणि सोलापूरमध्ये महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे.
हे ही वाचा : "शरद पवार अस्वस्थ झाले असते, तर ८४ वर्ष जगले नसते", राणेंचं विधान
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT