Pakistan: कांदा 220 तर पीठ 150 रुपये किलो.. पाकिस्तानची तर वाट लागली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pakistan Economy Crisis : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट अवस्थेत सापडली आहे. येणाऱ्या नव्या दिवशी नवीन संकंटांना सामोरं जावं लागत आहे. सामान्यांवर तर, उपासमारीची वेळ आली आहे. मानवाच्या दैनंदिन आयुष्यातील मुलभूत घटक म्हणजे अन्न. परंतु पाकिस्तानात अन्नासाठी रोज झगडावं लागतं आहे. धान्यांपासून ते प्रत्येक गोष्टींपर्यंतच्या किंमती अगदी गगनाला भिडल्या आहेत. दूध, तांदूळ लोकांना मिळणं बंद झालं आहे. अशी स्थिती पाहता पाकिस्तान आता काय खाणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

समजून घ्या: शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची निवडणूक का आणि कशी होते?

पाकिस्तानात 5 रूपयांचा बिस्कीट पुडा 50 रुपयांना…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाकिस्तानात एका 5 रूपयांच्या बिस्कीट पुड्याची किंमत ही 50 रूपये झाली आहे. तर, गव्हाच्या पिठाचा भाव 140 ते 160 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. तर, भारतात पीठाची किंमत 30 रूपये किलोपासून सुरू होते. पाकिस्तानात पिठाच्या पोत्यासाठी लोक आपापसात भांडत आहेत, तर पैसे घेऊन लोक पिठाने भरलेल्या ट्रकच्या मागे धावताना दिसत आहेत.

पाकिस्तानातील व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांनुसार 100 किलो गव्हाची पोती बाजारात 12 हजार ते 12 हजार 500 रुपये दराने विकली जात आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते 10,600 रुपये होते, यानंतर एका आठवड्यात 2 हजारांनी भाव वाढला आहे.

ADVERTISEMENT

पाकिस्तानावर प्रचंड कर्ज असल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानचा परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली ज्यामुळे पाकिस्तान आणखीनच कर्जात बुडला आहे. यामुळे सामान्यांना उपासमारीचा सामना करावा लागतो आहे.

ADVERTISEMENT

नवीन वर्षात अन्न-धान्यांच्या वाढलेल्या किंमती

पूर्वी पाकिस्तानात कांद्याचा भाव 36.7 रुपये प्रतिकिलो होता. पण आता याच कांद्यासाठी 220.4 रुपये किलो मोजावे लागत आहेत. तर बॉयलर चिकनची सरासरी किंमत 210.1 रुपये प्रति किलोवरून 383.5 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. याशिवाय मिठाचा दर प्रति किलो 32.9 रुपयांवरून 49.1 रुपये किलो झाला आहे.

एका वर्षातच पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाईचा दर 11.7 टक्क्यांवरून तब्बल 32.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तान स्टेटिस्टिक्स ब्यूरोद्वारे दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट होते. तसेच, यातून हे समजते की, लोकांना खाण्या-पिण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT