Pankaja Munde दिल्लीला रवाना, राज्यात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळणं, यानंतर घ्यावी लागलेली पत्रकार परिषद आणि राज्यभरातील पंकजा मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे या घडामोडींमुळे भाजपमधलं अंतर्गत राजकारण चांगलंच ढवळून निघालं. यानंतर पंकजा मुंडे दिल्ली रवाना झाल्या असून त्या तिकडे भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांचं नाव आघाडीवर होतं. परंतू ऐनवेळी प्रीतम यांचं नाव मागे पडून भागवत कराड यांना संधी देण्यात आली. यानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सोशस मीडियावर मुंडे समर्थकांनीही भाजप नेतृत्वाबद्दल उघड नाराजी बोलून दाखवली. ज्यानंतर पंकजा यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचं सांगितलं. यानंतर पंकजा मुंडे दिल्ली दरबारी दाखल झाल्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जे.पी.नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत पंकजा मुंडे आपली नाराजी बोलून दाखवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद नाकारण्यात आल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी मुंडे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. बीडमध्ये भाजपच्या ११ तालुकाअध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी आपल्या समर्थकांची मंगळवारी बैठक बोलावली आहे. त्यामुळे दिल्ली भेटीतून आज नेमक्या काय घडामोडी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT