Pankaja Munde: Pritam Munde यांचा मंत्रिपदाचा पत्ता कोणी कापला, पंकजाताई पुन्हा बंडाचा झेंडा फडकवणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांनां सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) कोण-कोण मंत्री होणार याबाबत बरीच चर्चा सुरु होती. सुरुवातीपासूनच नारायण राणे (Narayan Rane) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) या दोन नावांची बरीच चर्चा होती. या दोन्ही नेत्यांना मंत्रिपद मिळणार असा विश्वास भाजपमधील (BJP) अनेक नेतेही म्हणत होते. यानुसार नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. पण प्रीतम मुंडे यांचा शेवटच्या क्षणी पत्ता कट करण्यात आला.

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांची वर्णी न लागल्याने मुंडे समर्थक हे नाराज झाले आहेत. याशिवाय खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) या देखील प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एवढंच नव्हे तर नवनियुक्त मंत्र्यांना शुभेच्छा देणारं एक ट्विट देखील केलेलं नाही.

त्यामुळे आता पुन्हा एकदा अशी चर्चा सुरु झाली आहे की, पंकजा मुंडे या पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकवणार का? जर तसं झालंच तर ही परिस्थिती नेमकी कशामुळे आली आहे हे आपण आधी जाणून घेऊया.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांना कापला प्रीतम मुंडेंचा पत्ता?

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र भाजपची संपूर्ण जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली होती. तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये एक प्रकारचं सुप्त युद्ध सुरु झालं होतं.

ADVERTISEMENT

2014 साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यापासून देवेंद्र फडणवीस हे पक्षात अधिकाधिक सक्षम होते गेले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातील विरोधकांचे पंखही कापण्याचं काम केलं. त्यातच आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. तेव्हापासून फडणवीस यांनी पंकजा यांच्याविरोधात मोहीम सुरु केल्याची पक्षात चर्चा होती.

ADVERTISEMENT

दरम्यान, 2019 च्या विधानसभेत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघात धक्कादायकरित्या पराभव झाला होता. पण दुसरीकडे राज्यात सत्ताबदल होऊन फडणवीस यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं होतं. हीच गोष्ट ध्यानात घेऊन पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. ज्याचा थेट रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होता.

कारण यावेळी पंकजा मुंडे जो मेळावा घेतला होता. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यासारखे नेते देखील हजर होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं थेट नाव घेतलं नव्हतं. पण आपल्या पराभवाला फडणवीस हेच जबाबदार आहेत असा एकूण पंकजा मुंडे यांचा रोख होता.

यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत हे स्पष्टपणे दिसून आलं होतं. त्यामुळे त्यांची आता किमान विधानपरिषदेवर तरी वर्णी लावली जाईल असा अंदाज होता. पण त्यावेळी देखील पंकजा मुंडे यांना वगळण्यात आलं.

असं असताना किमान आपली बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी पंकजा मुंडे यांचाही प्रयत्न असल्याची चर्चा होती. पण महाराष्ट्रातून मंत्री म्हणून जी नावं समोर आली ती अतिशय अनपेक्षित अशी होती. जी अगदी शेवटच्या क्षणी समोर आलेली होती.

राजकीय समीकरणं लक्षात घेतली तर महाराष्ट्रातून ज्यांची मंत्री म्हणून नावं पुढे करण्यात आली ती सर्वच नावं ही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची असल्याचं मानलं जात आहे. अशावेळी या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांची देखील छाप असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात अशीच चर्चा सुरु झाली आहे की, प्रीतम मुंडे यांचा पत्ता हा देवेंद्र फडणवीस यांनी कट केला असावा.

Cabinet Expansion : प्रीतम मुंडेंचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे, पंकजा यांच्या ट्विटमुळे चित्र स्पष्ट?

पंकजा मुंडे पुन्हा बंडाचं निशाण फडकवणार?

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे या खूपच नाराज असल्याची चर्चा आहे. अशावेळी आता पंकजा मुंडे या पुन्हा एकदा बंडाचं निशाण फडकवू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण आता अशावेळी पक्षाकडून मुंडे भगिनींची नेमकी कशी समजूत काढली जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्या या सगळ्या चर्चाच सुरु आहेत. त्यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे या नेमक्या काय भूमिका घेणार यावर पुढचं संपूर्ण राजकारण अवलंबून आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT