कॉ. हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा – मेघा पानसरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तकः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षू पूर्ण झाली तरी अजून त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही यावर कुटूंबाने नाराजी व्यक्त केलीय. यावेळी माध्यमांशी बोलताना लवकरात लवकर पानसरेंच्या हल्लेखोरांचा शोध घेऊन कोर्टात ट्रायल सुरु व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटूंबियांनी केली आहे.

ADVERTISEMENT

यावेळी बोलताना त्यांची सून मेघा पानसरे यांनी कॉम्रेड पानसरे यांची हत्या करणारे मारेकरी अद्याप फरार असून त्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली. पानसरेंवर हल्ला करणारे प्रमुख आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार या दोघांना अटक करुन लवकरात लवकर ही या केसची ट्रायल सुरू करण्याची मागणी मेघा यांनी केली आहे.

अंधश्रद्धा विरोधी कार्यकर्ते गोविंद पानसरे मॉर्निंगवॉकला गेले असता त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 ला अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि कॉम्रेड जखमी झाले. 20 फेब्रुवारी 2015 ला उपचरांदरम्यान गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे यंदाही त्यांच्या कुटूंबियांसमवेत मॉर्निंग वॉक करत समर्थकांनी आणि सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर मॉर्निंग वॉक करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

हे वाचलं का?

काय होती ही घटना

कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्याबरोबर 16 फेब्रुवारी 2015 ला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला. तब्बल पाच वेळा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले. हल्ल्याच्या चार दिवसांनंतर उपचारांदरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडे, समीर गायकवाड सध्या बेलवर बाहेर आहेत. तर, सचिन अंधुरे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन हे तुरुंगात आहेत. गोरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित डेगवेकर या दोघांनाही कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर, पानसरेंवर हल्ला करणारे प्रमुख आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार हे दोघे फरार आहेत

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT