Param Bir Singh : परमबीर सिंहांच्या अडचणी वाढणार?; मुंबई पोलिसांची न्यायालयात धाव

सौरभ वक्तानिया

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. परमबीर सिंह गेल्या काही महिन्यांपासून गायब असून, त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यासाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. परमबीर सिंह गेल्या काही महिन्यांपासून गायब असून, त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. परमबीर सिंह सध्या गायब असून, त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या तपास प्रकरणात अटकपूर्व वॉरंट काढण्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर उद्या (29 ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.

Param bir singh : गायब झालेले पोलीस अधिकारी परमबीर सिंह चंदीगढमध्ये?

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हे दाखल झालेला असून, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 9 ऑक्टोबरला मुंबई पोलिसांनी या प्रकरणी परमबीर सिंह यांना समन्स बजावलं होतं. इतकंच नाही, तर पोलीस परमबीर सिंह यांच्या मलबार हिल परिसरातील त्यांच्या घरीही गेले होते. मात्र, ते तिथे आढळून आले नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp