नाशिकमध्येही अंशत: लॉकडाऊन, नाशिककरांवर काय असणार निर्बंध?
नाशिक: नाशिकमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अखेर उद्या (मंगळवार) मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यासंबंधी आजच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये सर्व व्यवहार सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत सुरु असणार आहेत. मात्र रात्री 7 वाजेनंतर निर्बंध असणार आहे. तसेच 4 तालुक्यातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]
ADVERTISEMENT
नाशिक: नाशिकमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अखेर उद्या (मंगळवार) मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन लागू होणार आहे. त्यासंबंधी आजच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये सर्व व्यवहार सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत सुरु असणार आहेत. मात्र रात्री 7 वाजेनंतर निर्बंध असणार आहे. तसेच 4 तालुक्यातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 15 मार्चनंतर लग्नसोहळ्यास मंगला कार्यालयात परवानगी नसेल.
ADVERTISEMENT
पालकमंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. अनेकदा आवाहन करूनही गर्दी नियंत्रित होत नाही. तसेच अनेक जण हे कोरोनाची नियमावली देखील पाळत नाही. जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव येथे सर्व शाळा आणि क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक, नांदगाव, मालेगाव, निफाड या 4 तालुक्यातील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे.
दरम्यान, यावेळी जीवनावश्यक वस्तू दुकाने/सेवा वगळता इतर सर्व दुकानं हे फक्त रात्री 7 वाजेपर्यंत चालू असणार आहे. तसेच 15 मार्च नंतरच्या विवाह समारंभांना मंगल कार्यालय व लॉन्सवर परवानगी नसणार आहे. त्यामुळे 25-30 ते लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
औरंगाबादमध्ये 11 मार्चपासून अंशत: लॉकडाऊन, वीकेंडला सगळं काही बंद!
नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची दाहकता वाढत असल्याचं दिसून येत आहे. कारण गेल्या 1 महिन्यात रुग्णसंख्या ही चौपट वाढली आहे.
ADVERTISEMENT
पाहा नाशिकमध्ये आणखी कोणते निर्बंध असणार:
ADVERTISEMENT
-
बार, हॉटेल्स सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी
जिम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर फक्त व्यक्तिगत वापरासाठी परवानगी
सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुले राहील. मात्र शनिवार, रविवार पूर्णपणे बंद राहतील.
गर्दी होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना बंदी
भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT