Yavatmal Doctor Attack : रुग्णाकडूनच प्राणघातक हल्ला, 2 डॉक्टर घायाळ

मुंबई तक

यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (vasantrao naik medical college yavatmal) गुरुवारी धक्कादायक घटना घडली. रात्री डॉक्टरांकडून (Doctor) वार्डमध्ये रुग्णांची तपासणी सुरू होती. याचवेळी एका रुग्णाने प्राणघातक हल्ला केला. यात दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णालयात आंदोलन (Doctors protest After Patient Attacks) सुरू केलं आहे. यवतमाळ येथील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (vasantrao naik medical college yavatmal) गुरुवारी धक्कादायक घटना घडली. रात्री डॉक्टरांकडून (Doctor) वार्डमध्ये रुग्णांची तपासणी सुरू होती. याचवेळी एका रुग्णाने प्राणघातक हल्ला केला. यात दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णालयात आंदोलन (Doctors protest After Patient Attacks) सुरू केलं आहे.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येनं रुग्ण येतात. दरम्यान, गुरूवारी रात्री दोन डॉक्टरांवर रुग्णाकडूनच चाकूहल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे. यामुळे रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ उडाला.

दोन डॉक्टरांवर हल्ला : यवतमाळमधील रुग्णालयात काय घडलं?

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुरुवारी रात्री डॉक्टरांकडून रुग्णांची पाहणी सुरू होती. याच वेळी उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने डॉक्टरांवर चाकूने हल्ला केला. यात दोन डॉक्टर जखमी झाले. डॉ. जेबिस्टॅन पॉल आणि डॉ. अभिषेक झा असं चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत.

यातील एका डॉक्टरच्या मानेजवळ चाकूने वार करण्यात आलेला आहे. डॉक्टर या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.