Petrol-Diesel Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीच्या जवळपास, प्रचंड महागाईने मुंबईकर हैराण

मुंबई तक

मुंबई: Petrol and Diesel Price Today 27 May 2021: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज (27 May 2021) जाहीर केलेल्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या (Petrol) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे शंभरीच्या पार गेले आहेत. मुंबईत (Mumbai) देखील पेट्रोल जवळजवळ शंभर रुपये झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर हे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: Petrol and Diesel Price Today 27 May 2021: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज (27 May 2021) जाहीर केलेल्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या (Petrol) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे शंभरीच्या पार गेले आहेत. मुंबईत (Mumbai) देखील पेट्रोल जवळजवळ शंभर रुपये झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर हे 99.94 रुपये एवढे आहे. याचाच अर्थ मुंबईत पेट्रोल हे आता शंभर रुपयांपासून फक्त 6 पैसेच दूर आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी स्थानिक करांचा विचार केल्यास पेट्रोल आजच शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

तर मुंबईत डिझेल (diesel) देखील प्रचंड महाग झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईत डिझेलचे दर 91.87 रुपये प्रति लीटर एवढं झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य मुंबईकर मात्र फारच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रमाणेच देशातील इतर शहरांमध्ये देखील इंधनाचे दर (Fuel Price) प्रचंड वाढले आहेत.

‘चार राज्यांचे निवडणूक निकाल लागले, आता पेट्रोल डिझेलचे दर वाढणार की काय?’

जाणून घ्या मोठ्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर:

हे वाचलं का?

    follow whatsapp