Viral Video: हद्दच झाली… 2000 ची नोट पाहिली अन् बाइकच्या टाकीत भरलेलं पेट्रोलच घेतलं काढून!
Jalaun Petrol Pump Video Viral : पेट्रोल पंपावरील एक विचित्रच घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये पेट्रोल भरायला गेलेल्या एका ग्राहकाने 2000 ची नोट दिल्याने त्याच्या गाड़ीतील सपूर्ण पेट्रोल काढण्य़ात आल्याचा प्रकार घडला आहे.या घटनेने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
Jalaun Petrol Pump Video Viral : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) नोटबंदीनंतर चलनात आणलेली 2000 नोट परत घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेकांनी 2000 च्या नोटा खर्च करायला सुरुवात केली होती. यामध्ये सर्वांधिक गर्दी ही पेट्रोल पंपावर (Petrol Pump) पाहायला मिळतेय. त्यामुळे पेट्रोल मालकांची सुट्टे पैशांची मोठी बोंब झाली आहे. त्यात आता पेट्रोल पंपावरील एक विचित्रच घटना समोर आली आहे. पेट्रोल भरायला गेलेल्या एका ग्राहकाने 2000 ची नोट दिल्याने त्याच्या गाड़ीतील सपूर्ण पेट्रोल काढण्य़ात आल्याचा प्रकार घडला आहे.या घटनेने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आरबीआयने (RBI) बाजारात या नोटा स्विकारण्याचे आदेश दिले असताना देखील ते नाकारले जात असल्याने संताप व्यक्त होतोय. (petrol pump worker drains out fuel from vehicel after man gives 2000 note viral video jalaun uttar pradesh)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) जालौनमधील पेट्रोल पंपावर (petrol pump) एक तरूण त्याची दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने पंपावरच्या कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकण्यास सांगितले. ग्राहकाने सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्याने पेट्रोल भरले. पण जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा ग्राहकाने त्याला 2000 ची नोट हातात दिली. त्यामुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्याने 2000 नोट न स्विकारता, थेट स्कुटीमध्ये पाईप टाकून भरलेले संपूर्ण पेट्रोल काढून घेतलं होतं. या घटनेने ग्राहकाला मोठा धक्का बसला होता.
हे ही वाचा : अंतर्वस्त्रावरुन राडा, पडला रक्ताचा सडा… 8 जण गंभीर जखमी
UP: Filled petrol in car, handed over 2000 rupees, petrol pump worker removed petrol back . The incident is of Jalaun pic.twitter.com/fU5m6j9ZVL
— Kaustuv Ray (@kaustuvray) May 23, 2023
हे वाचलं का?
जालौनच्या उरई कोतवाली भागात एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. खरंतर ग्राहकाने त्याच्या दुचाकीत 200 रूपयाचे पेट्रोल भरले होते. या बदल्यात त्याने पंप कर्मचाऱ्याला 2000 रूपयाची नोट दिली होती.पण पंप कर्मचाऱ्याने ती घेण्यास नकार दिला होता. यामुळे दोघांमध्ये मोठा वादही झाला. मात्र तरीही पंप कर्मचारी सुट्टे पैसे न देण्याच्या निर्णयावर ठाम होता. वाद आणखीणच वाढल्यानंतर पंप कर्मचाऱ्याने दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीत पाईप टाकून भरलेल संपूर्ण पेट्रोल काढून घेतले होते. ग्राहकांने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
आरबीआयच्या आदेशानंतर 2000 च्या नोटांचा चलनात वापर वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका पेट्रोल पंप चालकांना बसतोय.कारण ग्राहक 2000 ची नोट देऊन 19, 50 रूपयांचे पेट्रोल भऱतायत. त्यामुळे सुट्टे कुठून आणायचे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. याआधी दिवसातून 2 किंवा 3 वेळा 2000 च्या नोटा गल्ल्यात यायचा. पण आरबीआयच्या आदेशानंतर 60 ते 70 2000 च्या नोटा जमायला लागल्या आहेत. तसेच ग्राहक 500 किंवा 1000 चे पेट्रोल भरत असतील तर त्यांना सुट्टे देता येतील, पण जर 50 ते 100 चे पेट्रोल भरत असतील तर सु्ट्टे कुठून आणायची असा प्रश्न आमच्यासमोर आहे, असे पेट्रोल पंप चालक राजीव गिरहोत्रा म्हणतायत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : लग्नात नवरीची भलतीच मागणी, म्हणाली… नवऱ्यासह नातेवाईक झाले अवाक्!
दरम्यान देशभरातील सर्वच पेट्रोप पंपवर 2000 च्या सुट्याची बोंब आहे. त्यामुळे पंप मालकांनी 500 अथवा 1000 रूपयाचे पेट्रोल भरल्यास 2000 सुट्टे दिले जातील असे फलक लावले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT