‘पीएफआय’ सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप म्होरक्या पाकिस्तानचा? तपासात मोठे कनेक्शन हाती
नाशिक : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या पाच संशयित सदस्यांचे तपासादरम्यान पाकिस्तान कनेक्शन हाती आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस तपासात या संबंधित काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाने 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र जोडीला चार दिवसांची पोलीस कोठडीही राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील […]
ADVERTISEMENT

नाशिक : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या पाच संशयित सदस्यांचे तपासादरम्यान पाकिस्तान कनेक्शन हाती आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस तपासात या संबंधित काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयाने 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मात्र जोडीला चार दिवसांची पोलीस कोठडीही राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली आहे. तपासावेळी संशयितांची एकत्रित चौकशी करण्यासाठी पुढे गरजेनुसार चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे.
मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (26, मालेगाव), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (48), रझी अहमद खान (31, दोघे रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (29, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) अशी या पाच संशयितांची नाव आहेत. नाशिक दहशतवाद विरोधी पथकाने 22 सप्टेंबरला यांना अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीस 12 आणि नंतर 5 दिवसांची कोठडी सुनावली होती.
तपासादरम्यान या संशयितांकडून संगणक, हार्डडिस्क, मोबाईल जप्त करण्यात आले होते. यात संशयितांचा व्हॉट्सअप ग्रुप आढळून आला असून त्याचा अॅडमिन पाकिस्तानातील असल्याचे उघड झाले. या ग्रुपमध्ये भारतासह, पाकिस्तान, यूएई, अफगाणिस्तान देशांमधीलही सदस्य सहभागी आहेत. ग्रुपमध्ये 175 ते 177 सदस्य होते. यातील काही संशयित परदेशात जाऊन आले असल्याचंही समोर आले. तसेच बँकेचे व्यवहारही तपासण्यात आले.










