फोन टॅपिंग प्रकरणात राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांनी एकाच वाक्यात दिलं उत्तर
–योगेश पांडे, नागपूर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघालं आहे. आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून, तर दुसरीकडे राज्यपालांच्या अर्धवट अभिभाषणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादाने डोकं वर काढलं. त्यात आता गोव्यातील फोन टॅपिंगची भर पडली आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप […]
ADVERTISEMENT
–योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघालं आहे. आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून, तर दुसरीकडे राज्यपालांच्या अर्धवट अभिभाषणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादाने डोकं वर काढलं. त्यात आता गोव्यातील फोन टॅपिंगची भर पडली आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला. राऊतांच्या आरोपावर फडणवीसांनी भूमिका मांडली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांवर होत असलेल्या टीकेवरून महाविकास आघाडी सरकारलाच सुनावलं. त्याचबरोबर फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं.
हे वाचलं का?
जे घडलं त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली अन् महानायक होते राज्यपाल -शिवसेना
राज्यपालांवर होत असलेल्या टीकेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक असंवैधानिक कृती करायच्या आणि मग राज्यपालांच्या विरुद्ध बोलायचं. एक प्रकारे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. राज्यपाल एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ती संविधानानुसारच काम करते. त्यामुळे अशा प्रकारे त्यांना टार्गेट करणं अतिशय अयोग्य आहे.”
ADVERTISEMENT
गोव्यात काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर आरोप केला. या आरोपाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “हे ऐकून माझी करमणूक होतेय.”
ADVERTISEMENT
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी, अवघ्या 30 सेकंदात थांबवलं भाषण
संजय राऊतांचा आरोप काय?
शनिवारी मुंबई माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले होते की, “देशात विरोधी पक्षातील जे नेते आहेत, विशेषतः जिथे निवडणुका होत आहेत. तेथील खूप साऱ्या नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत. कालच (४ मार्च) गोव्यात काँग्रेसच्या वतीने फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती जनतेला कळली आहे.”
‘नवाब मलिकांनी हसीना पारकरशी व्यवहार केल्याचा आरोप आहे तरीही राजीनामा का नाही?’
“हे खरं आहे की महाराष्ट्रातही असंच झालं होतं. गोव्यातही हाच महाराष्ट्र पॅटर्न सुरू आहे. हा योगायोगच आहे की, त्यावेळी जे महाराष्ट्राचे नेते होते, ते सध्या गोव्याचे प्रभारी आहेत. कदाचित उत्तर प्रदेशातही फोन टॅपिंग सुरू असेल. मला अखिलेश यादव यांचीही काळजी वाटतेय,” असं राऊतांनी म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT