Phone Tapping प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार, दोषींवर कारवाई होणार-गृहमंत्री
Phone Tapping प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे आणि दोषींवर कारवाईही केली जाणार आहे असं आज महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांचा फोनही ते भाजपमध्ये असताना म्हणजेच 2016-2017 मध्ये टॅप झाला होता. फोन टॅपिंग प्रकरण हे गंभीर आहे त्या प्रकरणी सविस्तर चौकशी […]
ADVERTISEMENT

Phone Tapping प्रकरण अत्यंत गंभीर आहे त्या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे आणि दोषींवर कारवाईही केली जाणार आहे असं आज महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांचा फोनही ते भाजपमध्ये असताना म्हणजेच 2016-2017 मध्ये टॅप झाला होता. फोन टॅपिंग प्रकरण हे गंभीर आहे त्या प्रकरणी सविस्तर चौकशी केली जाईल. कोणत्या लोकप्रतिनिधींचे फोन टॅप झाले होते आणि संमतीचा कसा गैरवापर झाला हे शोधलं जाणार आहे असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
नाना पटोले यांनी काय आरोप केला होता?
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 2016-17 या वर्षात माझे फोन टॅप करण्यात आला होते. त्या काळात इतरही लोकांचे फोन टॅप झाले होते. मात्र एका खासगी टीव्ही चॅनलकडू मिळाली असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला होता. त्यानंतर आजही यावर त्यांनी विधानसभेत याप्रकरणी नाना पटोले यांनी आजही भाष्य केलं. ज्या अधिकाऱ्यांनी फोन टॅप केले त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर मान्यता घेतली होती का? याबाबतचा खुलासा केला पाहिजे. कुणाच्या इशाऱ्याने हे फोन टॅपिंग केलं जातं? मुस्लिम नाव लिहिलं जाऊन माझा फोन टॅप का केला गेला याचीही माहिती मिळाली पाहिजे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. लोकप्रतिनिधी असूनही, खासदार असून अंमली पदार्थांशी संबंधित आम्हाला भासवण्यात आलं हे सगळं का केलं गेलं याचा खुलासा झाला पाहिजे अशीही मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगनंतर सुबोध जयस्वाल एक पत्र लिहिलं होतं.. काय आहे त्या पत्रात?