पिंपरी-चिंचवड : सोशल मीडियावरुन दहशत पसरवणारे ‘कोयताभाई’ अटकेत
सोशल मीडियाच्या माध्यमातून हातात कोयता घेत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलिसी खाक्यासमोर या दोन्ही आरोपींनी माघार घेऊन आपली चूक मान्य केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस वायदंडे आणि अभय सुपेकर अशी या दोन आरोपींची नावं आहेत. हे दोघंही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड क्षेत्रात विविध […]
ADVERTISEMENT

सोशल मीडियाच्या माध्यमातून हातात कोयता घेत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलिसी खाक्यासमोर या दोन्ही आरोपींनी माघार घेऊन आपली चूक मान्य केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस वायदंडे आणि अभय सुपेकर अशी या दोन आरोपींची नावं आहेत. हे दोघंही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड क्षेत्रात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. दोन्हीही आरोपी सोशल मीडियावर स्वतःची ओळख कोयताभाई म्हणून करुन देत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते.
इन्स्टाग्रामवर या दोन आरोपींनी केलेलं रिल पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर पोलिसांनी तेजस आणि अभय यांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल करत पुन्हा असं कृत्य न करण्याचं मान्य केलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून त्यांची शस्त्रही ताब्यात घेतली आहेत.
Crime: डॉक्टर प्रियंकाची आत्महत्या नाही, तर डॉक्टर पतीनेच ‘यांच्या’ साथीने केली हत्या