PM Modi’s Speech Highlights: पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात काय-काय घोषणा केल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (7 जून) देशातील जनतेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील 18 वर्षावरील नागरिकांचंं लसीकरण देखील मोफत होणार असल्याची घोषणा केली. ज्याचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याचं स्पष्ट केंल आहे. तसंच लसीकरणासंबंधी जे 25 टक्के काम केंद्र सरकारने राज्यांकडे दिलं होतं ते आता पुन्हा एकदा केंद्राने स्वत:कडे घेतलं आहे. याशिवाय अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

Pm Narendra Modi: अनलॉक, फ्री लस, किंवा दुसरीच कोणता घोषणा? पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  • अनेक ठिकाणी अनलॉक करण्यात येत आहे. पण त्यामुळे कोरोना गेला आहे असं समजू नका. काळजी घ्या.

हे वाचलं का?

  • 80 कोटी नागरिकांना नोव्हेंबरपर्यंत मोफत रेशन दिलं जाणार

  • 21 जूननंतर 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस

  • ADVERTISEMENT

  • आज हा निर्णय घेण्यात आला आहे की, राज्य सरकारांकडे जे २५ टक्के काम होतं ते देखील आता भारत सरकारकडेच म्हणजेच केंद्र सरकारकडे असेल.

  • ADVERTISEMENT

  • अनेक राज्यांनी असं म्हटलं की, पूर्वी जी सिस्टम होती तीच चांगली होती.

  • यामुळे लसीकरणात काय-काय अडचणी आहेत याबाबत राज्यांना देखील अडचणी समजून आल्या.

  • 1 मेपासून राज्यांना २५ टक्के लसीकरणाचं काम सोपवलं. त्यांनी ते काम सुरु केलं.

  • मीडियामधील एका गटाने याबाबत कॅम्पेन देखील केलं जावं

  • लसीकरणाबाबत बराच दबाव देखील बनवला गेला.

  • अनेक राज्य सरकारांनी असं म्हटलं की, लसीकरणाचं विकेंद्रीकरण केलं जावं आणि ते राज्य सरकारांकडे सोपवलं जावं.

  • आपण एक वर्षात दोन ‘मेड इन इंडिया’ लस बनवून दाखवल्या

  • देशात सध्या 7 कंपन्यांकडून लस तयार करण्याचं काम सुरु

  • लस तयार करणाऱ्या कंपन्यांना हवं तेवढं साहाय्य केलं.

  • आपल्याकडे नोझल लसीबाबत देखील संशोधन सुरु आहे.

  • लसीची उपलब्धता वाढविण्यासाठी इतर देशातील कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहेत.

  • देशात आतापर्यंत 23 कोटी लसींचे डोस देण्यात आली आहेत.

  • प्रभावी लसीकरणासाठी देशानं मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविली

  • विचार करा जर आपल्याकडे स्वत:ची लस नसती तर भारतासारख्या विशाल देशात काय घडलं असतं?

  • आज संपूर्ण देशात लसीकरणाची मागणी आहे. त्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि लस बनविणाऱ्या कंपन्या या फारच कमी आहेत.

  • कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवच आहे.

  • कोरोनाला हरविण्यासाठी नियमांचं पालन करा

  • कोरोना काळात सर्वाधिक वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भासली, भारतात आजवर एवढी गरज कधीच भासली नव्हती.

  • देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरु आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाला सुरुवात:

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT