गाजावाजा न करता मोठे प्रकल्प गुजरातमध्ये : PM मोदीं केले गृहराज्याचे कौतुक
भावनगर : गुजरातमधील भाजप सरकारने प्रसिद्धीवर पैसे वाया न घालवता, गाजावाजा न करता राज्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणले आहेत, असे म्हणतं गृहराज्य गुजरात सरकारचे तोंडभरुन कौतुक केले. गुरुवारी गुजरातमध्ये ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. त्यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गुजरातला देशातील सर्वात मोठी किनारपट्टी लाभली […]
ADVERTISEMENT
भावनगर : गुजरातमधील भाजप सरकारने प्रसिद्धीवर पैसे वाया न घालवता, गाजावाजा न करता राज्यात अनेक मोठमोठे प्रकल्प आणले आहेत, असे म्हणतं गृहराज्य गुजरात सरकारचे तोंडभरुन कौतुक केले. गुरुवारी गुजरातमध्ये ६ हजार कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. त्यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गुजरातला देशातील सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर अनेक दशके गुजरातच्या विकासाकडे लक्ष दिले गेले नाही. पण मागील 20 वर्षांत भाजप सरकारच्या काळात गुजरातला संपन्नतेचे प्रवेशद्वार बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. लोकांची सेवा करणे हीच सत्ता मानल्यामुळे भाजपने कायमच वचनांची पूर्तता केली, असाही दावा मोदी यांनी केला.
यावेळी मोदी यांनी सुरत ते वाराणसी या मार्गावर विशेष ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच जगाच्या पाठीवर सुरतला हिरे व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी ड्रीम सिटी प्रकल्पाद्वारे काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मागील २० वर्षांत भाजप सरकारने सुरचा चेहरामोहरा बदलला आहे. या शहरामध्ये, नागरिकांमध्ये मोठी क्षमता आणि कौशल्ये आहेत. त्याचा योग्य वापर करून घेण्याचा विचार फक्त भाजप सरकारनेच केला, असेही ते म्हणाले.
हे वाचलं का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. काल त्यांच्या हस्ते जगातील पहिले सीएनजी टर्मिनल, एका बंदराचा विकास, कार्गो कंटेनर निर्मिती कारखाना यासह अन्य 6 हजार कोटींचे प्रकल्प सुरू करण्यात आले. याशिवाय सुरतमध्येही 3 हजार 400 कोटींच्या विकास कामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT