Sagar Rana Murder : सुशीलच्या सांगण्यावरुन सागरला मारहाण केली, अटकेतील आरोपीची पोलिसांकडे कबुली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडीयममध्ये पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी आज नवव्या आरोपीला अटक केली आहे. आज दिल्ली पोलिसांनी अटक केलेला आरोपी ४ मे रोजी सागर राणाला मारहाण करणाऱ्या गटात सहभागी होता. विजेंदर असं या आरोपीचं नाव असून सुशीलच्या सांगण्यावरुनच आपण सागर राणाला मारहाण केल्याचं त्याने कबुल केलंय.

ADVERTISEMENT

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात २३ मे रोजी मुख्य आरोपी सुशील कुमारसह आणखी एका आरोपीला अटक केली आहे. सुशील आणि अजय सध्या पोलीस कोठडीत असून दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात सुशील कुमारच्या हातात एक लाकडी काठी असून सागर राणा जमिनीवर पडलेला दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी आज केलेल्या अटकेमुळे सुशीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तब्बल १९ दिवस दिल्ली पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेला सुशील कुमार अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तपासादरम्यान सुशीलने आपण सागरला धडा शिकवण्यासाठी मारहाण केल्याचं कबुल केलं. त्याला जिवानीशी मारण्याचा आपला हेतू नव्हता असंही सुशील कुमार म्हणाला. दिल्लीच्या मॉडेल टाऊन परिसरातील एका घराच्या ताब्यावरुन सुशील आणि सागर राणामध्ये वाद झाला होता.

हे वाचलं का?

डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पैलवान सागरचा मृत्यू, सुशील कुमारच्या अडचणींमध्ये भर

सागर राणा सुशील कुमारच्या या फ्लॅटमध्ये राहत होता. सागर राणासोबत त्याचा सहकारी सोनू महालही इथेच रहायचा. सोनू हा कुख्यात गँगस्टर जाठेडीचा खास माणूस म्हणून ओळखला जातो. या फ्लॅटवरुन झालेल्या वादानंतर सागर राणा सुशील कुमारविरोधात बाहेर शेरेबाजी करत होता. ज्यामुळे संतापलेल्या सुशीलने आपल्याविरोधात बोलायची कोणाचीही हिंमत होऊ नये यावरुन सागर राणा आणि त्याच्या मित्राला ४ मे रोजी छत्रसाल स्टेडीयममध्ये मारहाण केली, ज्या मारहाणात सागरला प्राण गमवावे लागले.

ADVERTISEMENT

Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक पदक विजेता ते हत्येचा आरोपी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT