रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस; जलसमाधी आंदोलन रद्द करा अन्यथा…

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांच्यावतीने नोटीस देण्यात आली आहे. अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा पोलीस कारवाई करू, असा इशारा या नोटीशीद्वारे तुपकर यांना दिला आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांच्या निवासस्थानी जावून नोटीस बजावली.

ADVERTISEMENT

दरम्यान, तुपकर यांना दिलेल्या नोटिशीमुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. परंतु अशा नोटिशींना मी घाबरत नाही. काही झालं तरी जलसमाधी आंदोलन करणारचं असा ठाम निर्धार रविकांत तुपकर यांनी बोलून दाखविला. त्यामुळे सरकार आणि तुपकरांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

हे वाचलं का?

सोयाबीन, कापूस प्रश्नी रविकांत तुपकरांनी मागील काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खाजगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8 हजार 500 रुपये आणि कापसाचा भाव प्रति क्विंटल12 हजार 500 रुपये स्थिर रहावा यासाठी सरकारने धोरण आखावे, यासह अन्य मागण्या करत तुपकर आक्रमक झाले आहेत. यापूर्वी 6 नोव्हेंबर रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा मोर्चाही निघाला होता.

त्याचवेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन पेटवू, असा इशारा दिला होता. तसंच सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना नोटीस दिली आहे.

ADVERTISEMENT

रविकांत तुपकर मात्र आंदोलनावर ठाम :

सरकार शेतकऱ्यांना जगूही देत नाही आणि मरुही देत नाही. त्यामुळे अशा नोटीशीला आम्ही घाबरत नाही. अशा नोटीसांनी माझ्या घरातील कपाट भरले आहेत. जर सरकारला आमची प्रेतचं पाहिजे असतील तर 24 नोव्हेंबरला बघूनच घ्या…! असा इशारा तुपकर यांनी दिला. तसंच अरबी समुद्रात जलसमाधी घेणारचं, हिमंत असेल तर अडवूनच दाखवा, असे आवाहनही तुपकर यांनी सरकारला दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT