नागपूरमध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह, लिहून घेण्यात आलं हमीपत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

ADVERTISEMENT

नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि पोलिसांना यश आले आहे.नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे बालविवाह होत असल्याबाबतची माहिती चाईल्ड लाईन कडून जिल्हा माहिती आणि बाल विकास विभागाला मिळाली, त्याआधारे पोलीस आणि बालविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ एक पथक लग्न स्थळ पाठवले.

चंद्रपूरातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह पाचगाव येथे गुरुवारी होणार होता,बुधवारी लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती, मुलीला हळद आणि मेहंदी लावणे सुरू असतानाच पोलिस तेथे धडकले आणि बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले.

हे वाचलं का?

मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील जामगाव येथील रहिवासी असून नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे तिच्या नातेवाईकांकडे हा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता अशी माहिती आहे. ज्यावेळी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी अल्पवयीन मुलीला हळद लागण्याचा कार्यक्रम सुरू होता. पोलीस आणि पथकाने लगेचच मुलीच्या पालकांचे घरच्यांनाही बोलून उपस्थित नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कारवाईची माहिती दिली आणि पालकांकडून मुलीची अठरा वर्ष होईपर्यंत लग्न करणार नाही या संबंधीचे हमीपत्र सुद्धा यावेळी लिहून घेण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच नागपूर शहरातील यशोधरानगर परिसरात बालविवाह सुरू असतानाच जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी लग्न स्थळ गाठून बालविवाह थांबविला होता..

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

बालविवाह प्रतिबंधक कारवाई पठाण यांच्या नेतृत्वात बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना ठोंबरे, ग्रामसेवक प्रमोद वर्‍हाडे, सरपंच उषा ठाकरे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी सुनीता गणेश, मंगला टेंभूर्णे, पोलीस शिपाई आशिष खंडाईत, चांगदेव कुथे, संजय कातडे यांनी केली. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नागपूर शहरातील यशोधरानगर परिसरात एक बालविवाह होणार होता. तो होण्यापूर्वीच जिल्हा बाल संरक्षण कक्षाला तोही रोखण्यात यश आहे होते. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे. कोरोनामुळं लवकर लग्न करून आपल्या जबाबदारीतून काही पालक मुक्त होऊ इच्छितात. त्यामुळं कदाचित बालविवाहाचं प्रमाण वाढलं तर नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT