महाराष्ट्रात राजकीय संकट: ‘भाजपची रणनीती ठरलेली, रविवारपर्यंत नवीन सरकार येणार?’
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राजकारणातील ज्येष्ठ लोक भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडण्याची रणनीती तयार केली असल्याचे म्हणत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आगामी एक-दोन दिवसात मुंबईमध्ये येतील. आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे असे राज्यपालांना सांगतील, त्यामुळे महाविकास आघाडीने बहुमत गमावले आहे फ्लोर टेस्ट घ्यावी […]
ADVERTISEMENT
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राजकारणातील ज्येष्ठ लोक भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडण्याची रणनीती तयार केली असल्याचे म्हणत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आगामी एक-दोन दिवसात मुंबईमध्ये येतील. आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे असे राज्यपालांना सांगतील, त्यामुळे महाविकास आघाडीने बहुमत गमावले आहे फ्लोर टेस्ट घ्यावी अशी मागणी करतील असे तज्ञांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
ही झाली पहिली शक्यता, दुसरी शक्यता अशी की भाजप स्वतः कोश्यारी यांना फ्लोर टेस्ट घ्यावी असे पत्र देईल आणि जर राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले तर भाजप हे सुनिश्चित करेल की बंडखोर सेनेचे आमदार अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत, ज्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडेल. ज्येष्ठ राजकारण्यांचे म्हणणे आहे की या दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट घडली तर शनिवारी किंवा रविवारी राज्यात नवीन सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा आहे.
राज्यातील भाजप दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची वाट पाहत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी पक्षाच्या हायकमांडची अजून कुठलीही सूचनांची राज्यातील नेत्यांना आलेली नाही. सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या दोन्ही गोष्टींना आणखी वेग आला आहे.
हे वाचलं का?
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जर विधीमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली नाहीतर सेनेच्या बंडखोर आमदारांसमोर भाजप, मनसे किंवा प्रहार या पक्षात विलीन होण्याचे पर्याय आहेत. परंतु एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत असे बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपमध्ये निलीन होण्याचा प्रश्नच नाहीये असे तज्ञांचे म्हणणे आहे.
बंडखोर आमदार विशेष अधिवेशनाला उपस्थित न राहिल्यास सरकार पडेल आणि नवीन मुख्यमंत्री निवडून आल्यास, ते लगेच नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करतील, जो शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला खरा शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता देईल. राजकीय विश्लेषक म्हणाले की भाजपच्या दोन्ही योजना तयार आहेत. परंतु ते घाई करणार नाहीत. पहाटेच्या सुमारास अजित पवार यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला परंतु ते सरकार दोन दिवसांपेक्षा कमी काळ टिकले, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT