Pooja Chavan Case : माजी मंत्री संजय राठोड यांची चौकशी झाल्याचं पहिल्यांदाच समोर

मुंबई तक

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांची पोलिसांकडून चौकशी झाल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणी संजय राठोड यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत संजय राठोड यांनी पोलिसांना हे सांगितलं की पूजा चव्हाणची आणि माझी ओळख होती पण आमच्यात काहीही संबंध नव्हता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांची पोलिसांकडून चौकशी झाल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणी संजय राठोड यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत संजय राठोड यांनी पोलिसांना हे सांगितलं की पूजा चव्हाणची आणि माझी ओळख होती पण आमच्यात काहीही संबंध नव्हता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे. अशात पोलीस हे प्रकरण दुसरीकडे वळवत आहेत का? असाही प्रश्न निर्माण होतो आहे. कारण नेमकी काय चौकशी झाली? या प्रकरणाचा तपास कुठवर आला हे स्पष्ट सांगायला कुणीही तयार नाही. इंडिया टुडेने अमिताभ गुप्ता यांच्याशीही संपर्क साधला. मात्र त्यांनीही या प्रकरणी काहीही प्रतिसाद दिलेला नाही.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांच्या तपासात पोलीस महासंचालकांनी लक्ष घालावं अशी मागणी केली होती. पुणे पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी शंकाही उपस्थित केल्या होत्या. ७ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारल्याने पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. त्यानंतर 21 दिवसांनी म्हणजेच 28 फेब्रुवारीला वनमंत्री संजय राठोड यांना त्यांचं मंत्रिपद गमवावं लागलं होतं. त्याआधी संजय राठोड बराच काळ नॉट रिचेबलही होते. इंडिया टुडेने यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

या प्रकरणात मी तपासाला सहकार्य करतो आहे असं संजय राठोड यांनी सांगितलं असतं तर त्यामध्ये पारदर्शकता राहिली असती. मात्र तसं झालेलं नाही. पोलीसही याबाबत ठोस अशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे हे सगळं प्रकरण दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होतो आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp