प्रदीप शर्मा मनसुख हिरेन हत्येचा मुख्य आरोपी – NIA चं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संपूर्ण मुंबई पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एक नवीन घडामोड समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे हिरेन हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचं प्रतिज्ञापत्र NIA ने आज मुंबई हायकोर्टात सादर केलं आहे.

ADVERTISEMENT

NIA ने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार, हिरेन याच्या हत्येचा कट मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचण्यात आला. जिकडे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी हे बैठकीला उपस्थित होते. सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्माला 45 लाख दिल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. प्रदीप शर्मांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज NIA ने प्रतिज्ञापत्र दाखल केलं ज्यात ही माहिती समोर आली आहे.

मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात पुढची सुनावणी 17 जुलैला ठेवली आहे.

हे वाचलं का?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या गाडीचा मालक मनसुख हिरेन होता. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. यावरुन विरोधी पक्षातील भाजपने सभागृह दणाणून सोडलं होतं. ज्यानंतर या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्या आणि अँटेलिया प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली होती.

ज्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अनिल देशमुखांनी सचिन वाझेला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा आरोप केला. ज्यानंतर अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली होती

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT