नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात अशा घटना घडतील की, आश्चर्य वाटेल -प्रकाश आंबेडकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या बोलताना केंद्र सरकार व भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भारतीय संविधान आणि केंद्राकडून राज्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप होत असल्याचा मुद्दा मांडला. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या या भूमिकेचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केलं आहे. त्याचबरोबर देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा त्यांनी केला.

ADVERTISEMENT

प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देश हुकुमशाहीच्या वाटेवर असल्याचं मत मांडलं.

संघराज्य पद्धतीचा भंग करण्याचं काम केंद्राकडून होत असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे जुनंच आहे, पण आता सगळ्यांना त्याची जाणीव व्हायला लागली आहे. संविधान बदलणार, नवीन संविधान आलं, तर हुकुमशाही येण्याची शक्यता आहे. त्या हुकुमशाहीला आपण तोंड देऊ शकणार नाही. म्हणून ते आता आपापल्या मतदारांना सांगत आहेत.’

हे वाचलं का?

‘मी तर फकिर आहे.. झोळी घेऊन फिरतो’ असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

‘आता हे पक्ष आपल्या मतदारांना आपण संविधानवादी झालं पाहिजे, असं सांगत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. स्वागतार्ह आहे. देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशा काही घटना घडताना दिसतील की, ज्या तुम्हाला आश्चर्यकारक वाटतील, अशी परिस्थिती आहे’, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

ADVERTISEMENT

मागच्या आठवड्यात महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात केलेला बंद तोंडदेखलेपणा आणि देखावा होता. केंद्राने केलेल्या कायद्याचे मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीने 2005-06 मध्ये केलेल्या कायद्यात असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कसं कमी झालं? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. ‘घटनेनं केंद्राएवढेच अधिकार राज्यांना दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच स्पष्ट केलं होतं की, केंद्राइतकीच राज्य सार्वभौम असतील. असं असेल, तर रोजच्या कारभारात केंद्राची लुडबूड नको, हे सर्वच राज्यांनी ठरवलं पाहिजे. केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती यावर उघड चर्चा झाली पाहिजे’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Shiv Sena dussehra Melava: मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडली, दसरा मेळाव्याच्या भाषणातील 20 महत्त्वाचे मुद्दे

‘आणीबाणी, परकीय आक्रमण व विदेशी धोरण या तीन विषयात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावं. रोजच्या कारभरात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणं बंद करावं’, असंही ठाकरे म्हणाले होते.

त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांचा वापर सूडबुद्धीने केला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. ईडी, सीबीआय, आयकर, एनसीबी या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांना बदनाम केलं जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT