पवारांच्या हातात हात,चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यात सिंघमचा ‘जयकांत शिक्रे’ ठरला चर्चेचा विषय

मुंबई तक

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. चंद्रशेखर राव यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजला. या भेटीगाठींवरुन राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं. परंतू या दौऱ्यादरम्यान एका व्यक्तीची उपस्थितीत चर्चेचा विषय ठरली होते. ही व्यक्ती म्हणजे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज. अभिनेते प्रकाश राज हे नेहमी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. चंद्रशेखर राव यांचा मुंबई दौरा चांगलाच गाजला. या भेटीगाठींवरुन राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं. परंतू या दौऱ्यादरम्यान एका व्यक्तीची उपस्थितीत चर्चेचा विषय ठरली होते. ही व्यक्ती म्हणजे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज.

अभिनेते प्रकाश राज हे नेहमी आपल्या परखड आणि स्पष्ट मतांसाठी ओळखले जातात. अनेकदा प्रकाश राज यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जाहीर टीका केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश राज हे अपक्ष उमेदवार होते परंतू त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. एकीकडे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध बिगर भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री एकत्र येण्याच्या प्रयत्नात असताना प्रकाश राज यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या.

प्रकाश राज हे मुळचे कर्नाटकचे. दाक्षिणात्या सिनेसृष्टी आणि विशेषकरुन तेलगु सिनेसृष्टीत प्रकाश राज यांचा चांगलाच दबदबा आहे. सिंघम या सिनेमात प्रकाश राज यांनी साकारलेली जयकांत शिक्रे ही खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली होती. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशीही प्रकाश राज यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे KCR यांच्या एकदिवसीय दौऱ्यात प्रकाश राज यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर चंद्रशेखर राव यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ज्यात शरद पवार यांनी प्रकाश राज यांचा हात पकडल्याचं दिसत आहे. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्याच्या निर्मितीदरम्यान शरद पवारांनी दिलेल्या पाठींब्याची आठवण ठेवत त्यांचे आभार मानले. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. त्यामुळे भविष्यकाळात भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले तर त्यांच्यात जयकांत शिक्रे म्हणजे प्रकाश राज दिसणार का याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp