एकत्र बसून चहा पिणं म्हणजे विरोधी पक्षांची एकजुट नाही, नितीश कुमारांना प्रशांत किशोर यांचा टोला

मुंबई तक

एकत्र बसून चहा पिणं म्हणजे विरोधी पक्षांची एकजुट नाही असा टोला नितीश कुमारांना प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लगावला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौरे करून अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. याबाबत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला. आज तकसोबत केलेल्या खास चर्चेत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला आहे. काय म्हणाले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकत्र बसून चहा पिणं म्हणजे विरोधी पक्षांची एकजुट नाही असा टोला नितीश कुमारांना प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लगावला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौरे करून अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. याबाबत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला. आज तकसोबत केलेल्या खास चर्चेत प्रशांत किशोर यांनी हा टोला लगावला आहे.

काय म्हणाले आहेत प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणाबाबत?

ज्येष्ठ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत हे खास वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर प्रशांत किशोर यांनी असंही म्हटलं आहे की नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून महाआघाडीमध्ये जाणं ही राज्याच्या राजकाणावर आधारलेली घटना आहे. या घटनेचा विशेष परिणाम इतर राज्यांवर होणार नाही.

प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?; सोनिया गांधींना सांगितला ‘मिशन २०२४’चा प्लान

महाराष्ट्राच्या राजकणाबाबत काय म्हणाले प्रशांत किशोर?

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. मात्र ते सरकार गेलं आणि आता तिथे एनडीएचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही बदल झाला आहे त्याचा जसा परिणाम बिहारच्या राजकारणावर झाला नाही तसाच बिहारचा परिणाम हा राज्यापुरता मर्यादित आहे असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp