स्वतंत्र विदर्भाच्या वादात प्रशांत किशोर अ‍ॅक्टिव्ह मोडवर; नागपुरमध्ये मॅरेथॉन बैठकांचे सत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: राजकीय रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर यांनी याअगोदरच बिहारच्या राजकारणात एन्ट्री केलेली आहे. तेच प्रशांत किशोर आज महाराष्ट्रातील नागपुरात आले आहेत. महाराष्ट्रातील वेगळ्या विदर्भाची मागणी मागच्या सहा दशकांपासून आहे, त्या लढ्याला बळकटी देण्यासाठी प्रशांत किशोर विदर्भवादी नेत्यांना मदत करत आहेत. आज प्रशांत किशोर यांनी विदर्भवादी संघटनांची भेट घेतली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केल्याची चर्चा आहे. वेगळ्या विदर्भाची रणनीती ठरवण्यापूर्वी त्यांनी विदर्भाची मागणी करणाऱ्या आंदोलकांची, राजकीय पक्षांची, विचारवंतांशी चर्चा करण्यासाठी ते नागपुरात मॅरेथॉन बैठका घेत आहेत.

ADVERTISEMENT

आजच्या बैठकीपूर्वी प्रशांत किशोर यांच्या 20 सदस्यीय टीमने जुलै महिन्यात राज्याचा दौरा करून विदर्भातील 11 जिल्ह्यांचा सविस्तर अहवाल तयार केला होता. विदर्भातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे लोक त्यांच्या टीमसोबत संपर्कात होते. अनेक महिन्यांपासून या लोकांशी झूम कॉलद्वारे प्रशांत किशोर यांचे संभाषण सुरु आहे. नागपुरात होत असलेल्या या बैठकीमध्ये प्रशांत किशोर आज 5 तास या लोकांशी चर्चा करणार असून विदर्भ राज्यासाठी त्यांच्या काय सूचना आहेत, त्यानंतर भविष्याची रणनीती ठरवली जाईल असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

विदर्भाचे व्हिजन छोट्या राज्याचे नाही- प्रशांत किशोर

”विदर्भाचे व्हिजन हे छोटे राज्य या संकल्पनेशी जोडलेले नाही. छोट्या राज्याशिवाय इथली भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीही निगडीत आहे. त्यामुळे जे लोक या व्हिजनला लहान राज्य संबोधत आहेत, ते छोटे राज्य होणार नाही. इथे 10 लोकसभेच्या जागा आहेत म्हणजे हे काही छोटे राज्य नाही. विदर्भाला वारसा आहे, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थिती आहे, या लढ्यामध्ये माझी केवळ सल्लागाराची भूमिका आहे, हे लोक विदर्भाची चळवळ पुढे नेतील.” असे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT