प्रवीण दरेकरांना मुंबै बँक घोटाळा प्रकरणात दिलासा, पुरावे न सापडल्याने क्लीन चिट
प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना या घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला होता. २०१५ मधलं आहे मुंबै बँकेचं घोटाळा प्रकरण २०१५ मधील मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अनियमितेत प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असं […]
ADVERTISEMENT

प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना या घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला होता.
२०१५ मधलं आहे मुंबै बँकेचं घोटाळा प्रकरण
२०१५ मधील मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अनियमितेत प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असं सांगत आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण दरेकर यांना दिलासा दिला आहे.
मुंबै बँकेच्या अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करुन आणि बनावट कागदपत्रांद्वारे १२३ कोटींचा घोटाळा केल्याचा आहे. आरोप प्रवीण दरेकरांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी दरेकरांवर आरोप केल्यानंतर सुनावणी सुरू होती. यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे. बँकेने नाबार्डची परवानगी न घेता MPSIDC मध्ये अवैधरित्या ११० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. रिकव्हरी साईटची स्थापना करण्यासाठी बेकायदा निविदा देऊन बँकेचे सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान केलं. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून २७ मार्च २०१५ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
काय आहे मुंबै बँक घोटाळा?
मुंबै बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक आणि पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप