Amravati: धक्कादायक… PSI पोलीस अधिकाऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, अमरावती

ADVERTISEMENT

अमरावतीत (Amravati) एका PSI दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने (Police Office) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घेतली आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्थानकात PSI पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर अमरावती पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल (13 ऑगस्ट) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेगाव रहाटगाव रोडवरील महालक्ष्मी अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत ही घटना घडली आहे. दरम्यान, एका पीएसआय अधिकाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या का केली असावी? याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

हे वाचलं का?

मात्र, या घटनेच्या दोन दिवस अगोदर 11 ऑगस्ट रोजी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहली होती. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, कोणीतरी माझ्या नावाने फेक आयडी काढलं आहे. आणि तो लोकांना माझ्या नावाने पासे मागत आहे. कृपया सर्वांनी त्या फेक आयडीला रिपोर्ट करावे. कोणीही कसल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करू नये. आपलाच psi अनिल मुळे.’

अनिल मुळे यांनी त्याआधी फेसबुकवर पोस्ट ही 13 ऑक्टोबर 20202 ला केली होती. तब्बल 10 महिने ते फेसबुकपासून दूर होते. मात्र आत्महत्येच्या दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपली फेसबुक पोस्ट टाकली होती.

ADVERTISEMENT

दरम्यान, अशीही माहिती मिळाली आहे की, वैद्यकीय कारण देत गेल्या दोन-तीन महिन्यापासून ते सतत गैरहजर होते. त्यामुळे अनिल मुळे यांना अशी कोणती चिंता सतावत होती की, ज्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला?

ADVERTISEMENT

शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी लगेच नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. यावेळी घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट देखील सापडली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल मुळे हे सुरुवातीला दोन महिने वैद्यकीय रजेवर होते. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख असलेल्या एका अधिकाऱ्याने अशाप्रकारे आपलं जीवन संपवल्याने अमरावतीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिल मुळे यांनी घरगुती वादातून हे टोकाचं पाऊल उचललं असू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काही जणांना असाही संशय व्यक्त केला आहे की, ही आत्महत्या आहे की हत्या याचा देखील पोलिसांनी तपास करावा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT