पुणे: रस्तावरुन जाणाऱ्या 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यातच घुसली सळई, Video व्हायरल

मुंबई तक

पुणे: पुण्यातील मुंढवा येथे एका 12 वर्षीय मुलाच्या डोक्यात थेट उंचावरुन पडलेली सळई घुसल्याचा अत्यंत धक्कादायक व्हीडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मात्र, यातील दृश्य अत्यंत विचलित करणारी आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा येथील एका इमारतीवरून केबल ओढण्याचे काम सुरू होते. याच वेळी त्या इमारतीच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे: पुण्यातील मुंढवा येथे एका 12 वर्षीय मुलाच्या डोक्यात थेट उंचावरुन पडलेली सळई घुसल्याचा अत्यंत धक्कादायक व्हीडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. मात्र, यातील दृश्य अत्यंत विचलित करणारी आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा येथील एका इमारतीवरून केबल ओढण्याचे काम सुरू होते. याच वेळी त्या इमारतीच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरुन एक 12 वर्षाचा मुलगा जात होता. पण याचवेळी इमारतीच्या वरच्या भागातून पडलेली सळई थेट मुलाच्या डोक्यातच घुसली.

हा सगळा प्रकार पापणी लवण्याचा आत घडला. त्यामुळे मुलाला देखील काय झालं ते कळलं नाही. त्यामुळे तो डोक्यात घुसलेली सळई घेऊन काही पावलं तसाच पुढे गेला आणि नंतर जमिनीवर कोसळला. आता या प्रकरणी राजेश भारती याच्यासह दोन कामगारांविरोधात मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp