पुणे : आई-वडील गमावलेल्या 9 वर्षीय पुतणीवर काकाकडून 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार
पुणे: पुण्यातील वडगाव येथे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल तीन वर्षापासून 9 वर्षाच्या पुतणीवर काकाने लैंगिक अत्याचार करीत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता वडगाव येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 9 वर्षीय मुलीच्या आई वडिलांचे निधन चार वर्षापुर्वी झाले […]
ADVERTISEMENT

पुणे: पुण्यातील वडगाव येथे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल तीन वर्षापासून 9 वर्षाच्या पुतणीवर काकाने लैंगिक अत्याचार करीत असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता वडगाव येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 9 वर्षीय मुलीच्या आई वडिलांचे निधन चार वर्षापुर्वी झाले होते. त्यानंतर ती आणि तिचा भावा आरोपी काकाच्या घरी राहण्यास आले होते. त्यानंतर म्हणजे साधारणपणे 2018 डिसेंबर ते आजअखेर तिच्यावर आरोपी काकाने तब्बल 3 वर्ष सतत लैंगिक अत्याचार करत होता.
दरम्यान, यावेळी आरोपी काकाने अशी धमकी दिली की, ‘जर तू हे कोणाला सांगितले. तर मी तुझ्या भावाला मारून टाकेन’, दरम्यान, हा संपूर्ण प्रकार असह्य झाल्याने अखेर पीडित 9 वर्षीय मुलीने हा प्रकार इमारती मधील एका महिलेला सांगितला.
त्यानंतर त्या महिलेने पोलिसात येऊन तक्रार देताच, आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अशी माहिती सिंहगड पोलिसांनी दिली आहे.