पुणे : शुल्लक गोष्टीवरून वाद झाला अन् आरोपीने पोटात खुपसला चाकू; तरुणाचा मृत्यू

मुंबई तक

महिला अत्याचार आणि गुन्हेगारींच्या घटनेमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात तरुणाची शुल्लक गोष्टीवरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्यानंतर आरोपीने तरुणाच्या पोटात चाकू खुपसला. यातच त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील दारूवाला पुलाजवळ ही घटना घडली असून, मयत तरुण आणि आरोपीमध्ये भंगार गोळा करत असताना क्षुल्लक कारणांवरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

महिला अत्याचार आणि गुन्हेगारींच्या घटनेमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात तरुणाची शुल्लक गोष्टीवरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्यानंतर आरोपीने तरुणाच्या पोटात चाकू खुपसला. यातच त्याचा मृत्यू झाला.

पुण्यातील दारूवाला पुलाजवळ ही घटना घडली असून, मयत तरुण आणि आरोपीमध्ये भंगार गोळा करत असताना क्षुल्लक कारणांवरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अमन यादव (वय 27) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.

Crime: धक्कादायक… 12 वर्षीय मुलाचा 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन यादव हा भंगार गोळा करण्याचं काम करायचा. त्याची चार दिवसांपूर्वी आरोपीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता.