Pune Crime : ‘तुला खल्लासच करतो’, ‘हा’ संशय अन् नवऱ्याचे पत्नीवर सपासप वार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pune crime news husband stabs his wife with knife shocking crime story viman nagar pune
pune crime news husband stabs his wife with knife shocking crime story viman nagar pune
social share
google news

Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने (Husband) चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर (WIFE) चाकुहल्ला केल्याची घटना घडली आहे. ‘तुझी दुसऱ्या मुलासोबत लफडी आहेत’ आणि ‘मी तुला सोडत नाही आता खल्लास करतो’, अशी धमकी देऊन पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात पत्नी बचावली आहे. विमाननगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस (Police) करत आहेत. (pune crime news husband stabs his wife with knife shocking crime story viman nagar pune)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक आढाव त्याच्या पत्नीसोबत पुण्यात राहतो. त्यादिवशी 3 डिसेंबरला अशोक आढाव त्याच्या पत्नीला घेऊन विमान नगर भागातील हॉटेल बॅकस्टेजला गेले होते. या दरम्यान कोणत्या तरी कारणावरून अशोक आढावचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला. या वादातून अशोक आढावने पत्नीला तुझे लफडे दुसऱ्या मुलासोबत आहे असे बोलून तिला शिविगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली.

हे ही वाचा : Assembly Election 2023 : बालमुकुंद ते ओतराम… भाजपच्या चार महंतांचं काय झालं?

वाद वाढताच पत्नी हॉटेलमधून बाहेर पडली. त्यानंतर पुन्हा अशोक आढावने तिच्या चारित्र्यांवर पुन्हा संशय घेत आता तुला सोडत नाही, खल्लास करतो,अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर अशोकने स्वत: जवळ बाळगलेला चाकू बाहेर काढून पत्नीवर सपासप वार करत तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या घटनेतून बचावली आहे.

हे वाचलं का?

पत्नीवर झालेल्या हल्ल्यानंतर तिला लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तिचा जीव वाचला आहे. या प्रकरणी पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अशोक आढाव (31) विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस देशमुख करीत आहेत.

हे ही वाचा : Ishawar Sahu : दंगलीत मारला गेला मुलगा, मुजराने काँग्रेस आमदाराला केला ‘गेम’

डॉक्टरचे अश्लील चाळे

स्वारगेटमधील मुकुंदनगर परिसरात न्युरोलॉजीस्ट डॉ. श्रीपाद पुजारी याचे रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात जाण्यासाठी एक तरुणी आली होती. तिला मायग्रेनचा त्रास होत होता. म्हणून ती श्रीपाद पुजारीकडे आली होती. रुग्णालयात त्या तरुणीशिवाय कोणीच नसल्याने श्रीपाद पुजारीने तिच्याबरोबर वाईट वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिला प्रश्न विचारत तिला तो म्हणाला की, ‘तू एकटीच आली आहेस का? तू किती सुंदर व शांत आहेस, माझ्या राणी’ असं म्हणत त्याने युवतीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर युवतीने थेट पोलिसात जात डॉक्टरविरोधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. यायुवतीच्या तक्रारीनंतर डॉक्टरविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT