पुणे हे देशाला दिशा देणारं शहर आणि महान व्यक्तीमत्त्वाची भूमी-अमित शाह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे हे देशाला दिशा देणारं शहर आहे असं वक्तव्य आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलं आहे. छत्रपती शिवरायांचे पाय या पवित्र भूमिला लागले आहेत. लोकमान्य टिळक पुण्यात वास्तव्य करत होते. मी महापालिकेत गेलो होतो तिथे मी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन केलं. देशाला दिशा देण्याचं काम या शहराने केलं आहे. महान व्यक्तिमत्त्वाची भूमी आहे. ज्या सगळ्यांनी देशाला दिशा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षात देशाची प्रगती केली. त्यांनी परिवर्तनाची लाट या देशात आणली.

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदींच्या आधी दहा वर्षे काँग्रेसचं सरकार होतं. सोनिया गांधी आणि मौनीबाबा सत्ते होते. देशावर हल्ले झाले, काहीही झालं तरीही मौनीबाबा काहीच बोलत नसत. मोदी सत्तेत आल्यानंतर जेव्हा उरी आणि पुलवामा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानला आपण घरात घुसून उत्तर दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला कळलं की भारतात काँग्रेसचं सरकार नाही. आपण जर कुरापती काढल्या तर आपल्याला उत्तर मिळणार ते पाकिस्तानला कळलं.

हे वाचलं का?

भारतीय जनसंघाचं बीज ज्यांनी लावलं त्यांना हे माहित होतं की उद्या याचा वटवृक्ष होणार आहे. त्याचाच परिणाम आपण पाहतो आहोत की आज भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पार्टीचं भविष्य हे कार्यकर्ते आहेत. या पक्षाने कार्यकर्त्यांनाच कायम मोठं केलं. त्याचं उदाहरण मी आहे. मी चटया पसरवणारा कार्यकर्ता होतो. पक्षात जो मागत राहतो त्याला काहीच मिळत नाही पण जो मागत नाही त्याला कधी काही कमी पडत नाही असं वक्तव्य आज अमित शाह यांनी पुण्यात केलं आहे.

आज काश्मीर ते कन्याकुमारी इतका विस्तार झालेला हा पक्ष ठरला आहे. जे आपल्याला हसत होते हम दो हमारे दो असं चिडवत होते ते काँग्रेसचे लोक आज 44 जागांवर अडकून राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 300 खासदारांची संख्या आपण दोनदा पूर्ण केली आहे. भाजप हा कायमच कार्यकर्त्यांना महत्त्व देत आलेला पक्ष आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो. वचन देऊन विसरणारं हे सरकार नाही. आम्हाला मायावती, अखिलेश यादव, मुलायम सिंह हे उपरोधाने विचारायचे की मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे. आज त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचं भूमिपूजन करून उत्तर दिलं आहे. जेव्हा मनात शुद्ध भावना असते तेव्हा अशा टोमण्यांकडे दुर्लक्ष करायचं होतं. तेच दुर्लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लवकरच रामलल्लाचं मंदिर उभं राहतं आहे. देशाला गौरव वाटेल असं मंदिर अयोद्धेत निर्मिलं जातं आहे. त्यामुळे टोमणे मारणाऱ्यांची तोंडं बंद झाली असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT