ग्रामीण पुण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; जुन्नरमध्ये 7 जणांना संसर्ग

मुंबई तक

-स्मिता शिंदे, जुन्नर पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण ७ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर सर्व लोकांचे आरटी पीसीआर (rt-pcr) नमुने घेण्यात आले. सदर नमुने 12 डिसेंबरला पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. या सर्व […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

-स्मिता शिंदे, जुन्नर

पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण ७ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर सर्व लोकांचे आरटी पीसीआर (rt-pcr) नमुने घेण्यात आले. सदर नमुने 12 डिसेंबरला पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते.

या सर्व पर्यटकांपैकी एकूण 7 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं निदान झालं आहे.

सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. यासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आलेले आहे व पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहे अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैधकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp