Pune Crime : एक गैरसमज अन् ७ जण जीवाला मुकले! ‘असा’ झाला हत्येचा उलगडा
Seven members of a family suicide case Pune : दौंड : एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात (Seven deadbody found in a bhima) आढळून आल्यानंतर पुण्यात (Pune) जिल्ह्यात खळबळ उडाली. मुलाने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणल्यानं समाजात बदनामी होण्याच्या भीतीने ७ जणांनी एकाचवेळी आत्महत्या (commit suicide) केल्याचं सांगण्यात आलं. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा […]
ADVERTISEMENT

Seven members of a family suicide case Pune :
दौंड : एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात (Seven deadbody found in a bhima) आढळून आल्यानंतर पुण्यात (Pune) जिल्ह्यात खळबळ उडाली. मुलाने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणल्यानं समाजात बदनामी होण्याच्या भीतीने ७ जणांनी एकाचवेळी आत्महत्या (commit suicide) केल्याचं सांगण्यात आलं. मंगळवारी दिवसभर या प्रकरणाची चर्चा सुरु होती.
मात्र, बुधवार (२५ जानेवारी) या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं. या ७ जणांनी आत्महत्या (suicide) केली नाही, तर त्यांची हत्या (Murder) करण्यात आल्याचं तपासातून समोर आलं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) ज्या ठिकाणी मयत कुटुंब राहत होते त्यांच्या बाजूला राहत असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांनी हत्येची कबुलीही दिली आहे. मात्र, अतिशय क्लिष्ट असा या प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूंनी तपास केला.
Pune Crime : एकाच कुटुंबातील त्या 7 जणांची आत्महत्या नाही, तर हत्या!