पुणे : बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीवर 19 वर्षाच्या तरुणाने केला बलात्कार; तळजाई टेकडीवरील घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली असल्याचं दिसून येत आहे. त्यातही बलात्काराच्या वाढत्या घटना या पुणेकरांच्या चिंतेत अधिक भर घालत आहेत. नुकतंच पुण्यात बर्थडे पार्टीला गेलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणीवर 19 वर्षाच्या तरुणाने बलात्कार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

पुण्यातील तळजाई टेकडीवर बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या तरुणीवर तेथील जंगलात बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शुभम सीताराम शिंदे (वय 19 वर्ष, रा. धनकवडी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक एस. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पीडित तरुणीला आरोपी शुभम याने वाढदिवसाची पार्टी आहे. त्यामुळे तू पार्टीला यायला हवी असं सांगितलं. तसंच यावेळी त्याने तिला असंही सांगितलं की, ‘तू तळजाई शेवटचा बस स्टॉप येथे ये.’

जेव्हा तरुणी तिथे पोहचली त्यावेळी आरोपी शुभम याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. त्या ठिकाणी आरोपी आणि त्याचा मित्र हे दारू पीत बसले होते. त्यावेळी 22 वर्षीय पीडित तरुणी बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन बसली.

ADVERTISEMENT

या भागात थंडी अधिक असल्याने तरुणी तिथेच झोपी गेली होती. त्यानंतर आरोपी शुभम हा तिला जवळच असलेल्या जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

ADVERTISEMENT

पुणे हादरलं! २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; चार नराधमांना अटक

दरम्यान, याप्रकरणी पीडीत तरुणीने तात्काळ पोलिसात धाव घेतली. तरुणीने, सहकार पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. असं वरिष्ठ निरीक्षक एस. देसाई यांनी सांगितले.

याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शुभम शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आल्याचे वरीष्ठ निरीक्षक एस. देसाई यांनी सांगितले.

मात्र या संपूर्ण घटनेने पुणेकरांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे पुण्यासारख्या शहरात मुली-महिला या सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारी आणि बलात्कारासारख्या घटनांना आवर घालायचा असल्यास पोलीस प्रशासनाला कठोरातील कठोर कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. तसं न झाल्यास पुण्यातील स्थिती ही हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता पुणेकरांना अशी आशा आहे की, अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT