Rupali Patil Thombare: पुण्यात मनसेला धक्का! रुपाली पाटील-ठोंबरेंनी दिला राजीनामा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) रणरागिणी अशी ओळख असलेल्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत मोठा धक्का दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. बुधवार (14 डिसेंबर) पासून त्यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात होणार आहे. असं असतानाच राज ठाकरे यांची भेट न घेताच रुपाली पाटील यांनी आपला राजीनामा दिला आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील मनसेच्या अत्यंत आक्रमक नेत्या अशी रुपाली पाटील यांची ओळख होती. मनसेचं पुण्यातील सर्वात चर्चेत असणारं नाव रुपाली पाटील-ठोंबरे यांचं होतं. महाराष्ट्रभर सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोविंग देखील प्रचंड आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनामा देण्याने पुण्यात मनसेला मोठं खिंडार पडलं आहे.

पुण्यात आता लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनसेनं पुण्यात पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील गेल्या अनेक महिन्यात पुण्याच्या दौऱ्यावर अनेकदा आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, असं असताना आता रुपाली पाटील यांच्यासारख्या कडवट मनसे नेत्याने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाची चिंता वाढली आहे.

हे वाचलं का?

महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना रुपाली पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणं हे मनसेसाठी नक्कीच चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे आता याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या राजीनाम्यात नेमकं म्हटलं आहे:

ADVERTISEMENT

आदरणीय राजसाहेब ठाकरे

ADVERTISEMENT

अध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

दिनांक : १४.१२.२०२१

सप्रेम जय महाराष्ट्र,

मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद व मा.”श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल.

जय महाराष्ट्र

आपली कार्यकर्ती

सौ.रुपाली पाटील ठोंबरे

असं म्हणत रुपाली पाटील यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.

कोण आहेत रुपाली पाटील-ठोंबरे?

रुपाली पाटील या पुण्यातील मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. विशेषत: तरुणांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आतापर्यंत पुण्यात अनेक आंदोलनं उभारली होती. त्यामुळेच त्या तरुण वर्गात अधिकच क्रेझ होती.

रुपाली पाटील यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक पदही भूषवलं आहे. मनसेमध्ये त्यांच्यावर विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. याशिवाय मनसे महिला शहराध्यक्ष पदही त्यांना देण्यात आलं होतं. तर पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील त्यांनी लढवली होती.

बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमक हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरे पुढे नेऊ शकतात का?

रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार की शिवसेनेत?

दरम्यान, मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर रुपाली पाटील या आता नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत पुण्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. काहींच्या मते, रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, त्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात. कारण आपला राजीनामा देण्याच्या काही तास आधी रुपाली पाटील यांनी शिवसेना आणि युवासेना नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली आहे. त्यामुळेच आता रुपाली पाटील या राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT