पुणे: मोबाइल नंबर न दिल्याने तरुणीवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: तरुणीने मोबाईल नंबर न दिल्याने पुण्यातील खडकी परिसरात राहणार्‍या 18 वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

सोहेल शफीक मुलाणी (वय 23 वर्ष) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरात राहणारी 18 वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी सोहेल शफीक मुलाणी हे दोघे साधारणपणे दोन वर्षापासून ओळखीचे आहेत. पण आरोपी हा पीडित तरुणीला मागील काही दिवसापासून पाठलाग करून त्रास देत होता.

त्याच दरम्यान 31 जानेवारी रोजी पीडित तरुणी पाटील कॉम्प्लेक्स येथील बस स्टॉपवर सव्वा पाचच्या सुमारास थांबली होती. तेव्हा आरोपी सोहेल शफीक मुलाणी हा तिथे आला. यावेळी तो ‘तरुणीला म्हणाला तू माझ्याशी का बोलत नाहीस? तुझा नंबर दे.’ पण यावेळी तरुणीने आपला मोबाइल नंबर देण्यास नकार दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

CCTV: भर रस्त्यात सायकलवरुन जाणाऱ्या पत्नीवर फेकलं अ‍ॅसिड, नागपुरातील धक्कादायक घटना

जेव्हा तरुणी तिथून पुढे जाऊ लागली तेव्हा आरोपी सोहेल याने तरुणीला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. ‘मला नंबर नाही दिल्यास, तुझ्यावर चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकून जीवे ठार मारेल.’ अशी धमकी तरुणाने दिली. दरम्यान, यानंतर आरोपी घटना स्थळावरून पसार झाला.

ADVERTISEMENT

या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे खडकी पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

पुण्यात चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला केला होता. . पत्नीने कामाचे ठिकाण न दाखवल्याने पतीने तिच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना पुण्यातील बोपदेव घाटात घडली होती. चारित्र्याच्या संशयावरून पतीने हे भयंकर कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले होते. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ आरोपी पतीला अटक केली होती.

आरोपी पती दिनेश धुमक (वय 39 वर्ष) हा बावधन गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती त्याच्या अटकेनंतर पोलिसांकडून देण्यात आली होती.

उपनिरीक्षक चैताली गापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश आणि फिर्यादी पत्नी या दोघांचा प्रेम विवाह असून आरोपी पती फिल्टर दुरूस्तीचे काम करतो. तर फिर्यादी पत्नी घरगुती काम करते. काही दिवसांपासून आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होती.

ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा आरोपी पती दिनेश हा आपल्या पत्नीला म्हणाला की, ‘तू कुठं काम करतेस ते मला दाखव’, असं म्हणत त्याने पत्नीला गाडीवर बसवून बोपदेव घाटामध्ये नेलं. मात्र तिथे पोहचल्यावर तिने आपल्या कामाचे ठिकाण दाखविण्यास त्याला नकार दिला. त्यामुळे दिनेशच्या रागाचा पारा आणखी चढला.

‘तू कशी काम करतेस हेच बघतो,’ असं म्हणत त्याने आपल्या आपल्या पत्नीला तिच्या तोंडावरील मास्क खाली घेण्यास सांगितला. पत्नीने मास्क खाली घेताच पती दिनेशने त्याचवेळी त्याच्या जवळ असलेल्या बाटलीमधील अ‍ॅसिड थेट पत्नीच्या तोंडावर आणि अंगावर फेकलं. यामध्ये त्याची पत्नी ही गंभीररित्या जखमी झाली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT