पुणे : ग्राहकांकडून 3000 घ्यायचे अन् महिलांना द्यायचे फक्त 500; लॉजमध्येच सुरू केला कुंटणखाना

मुंबई तक

मसाज पार्लरच्या नावाखाली पती-पत्नीकडून सुरू असलेल्या देहविक्रीच्या घटना चर्चेत असतानाच आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेनं कारवाई करत लॉजमध्येच सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी 10 महिलांची सुटका केली असुन, एकाला अटक केली आहे. लॉजचा मॅनेजरच महिलांकडून देहविक्री करण्यास भाग पाडत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. देहुरोड परिसरात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मसाज पार्लरच्या नावाखाली पती-पत्नीकडून सुरू असलेल्या देहविक्रीच्या घटना चर्चेत असतानाच आता आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शाखेनं कारवाई करत लॉजमध्येच सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी 10 महिलांची सुटका केली असुन, एकाला अटक केली आहे. लॉजचा मॅनेजरच महिलांकडून देहविक्री करण्यास भाग पाडत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

देहुरोड परिसरात मुंबई-बुंगळुरू महामार्गावर असलेल्या हॉटेल द्वारका लॉजिंगमध्ये देहविक्रीचं रॅकेट सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक शोखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर सामाजिक शाखेच्या 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 13 इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली पती-पत्नी करत होते देहविक्रीचा गोरखधंदा; तीन महिलांची सुटका

पोलिसांच्या पथकाने अचानक हॉटेल द्वारका लॉजवर धाड टाकली. लॉजची झाडाझडती घेताना पोलिसांना आतमध्ये 10 महिला आढळून आल्या. यात 4 महिला या पश्चिम बंगालमधील आहेत. तर 2 कर्नाटक, 1 आसाममधील आणि 3 महिला महाराष्ट्रातीलच आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लॉजचा मॅनेजरच या महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री करुन घ्यायचा.

हे वाचलं का?

    follow whatsapp