Lakhimpur Kheri : राहुल गांधींना योगी सरकारनं भेटीची परवानगी नाकारली
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराचे मंगळवारी उत्तर प्रदेशात पडसाद उमटले. या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ लखीमपूर खीरीला भेट देणार होते. मात्र, योगी सरकारने भेटीची परवानगी फेटाळून लावली आहे. लखीमपूर खीरी येथे गाडी चिरडून शेतकऱ्यांना मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराचे मंगळवारी उत्तर प्रदेशात पडसाद उमटले. या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ लखीमपूर खीरीला भेट देणार होते. मात्र, योगी सरकारने भेटीची परवानगी फेटाळून लावली आहे.
लखीमपूर खीरी येथे गाडी चिरडून शेतकऱ्यांना मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले असून, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील योगी सरकारला धारेवर धरलं आहे.
लखीमपूर खीरीला भेट देण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन नजरकैद करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून प्रियंका गांधी नजरकैदेत असून, राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं शिष्टमंडळ आज लखीमपूर खीरीला भेट देणार होते.
राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी काँग्रेसकडून परवानगी मागण्यात आली होती. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शिष्टमंडळाच्या दौऱ्यासाठीची परवानगी मागितली होती. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने भेटीची परवानगी नाकारली आहे. लखीमपूर खीरीत प्रशासनाने 144 कलम लावलं आहे.