राहुल गांधी किलोऐवजी लिटर म्हणाल्याने सोशल मीडियावर ट्रोल; व्हिडीओ होत आहे व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राहुल गांधी यांनी रविवारी दिल्ली येथे काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्च्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. दूध, मैदा, गॅस सिलिंडर, मोहरीचे तेल आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्याचे त्यांनी सांगितले. यादरम्यान त्यांची जीभ अशा प्रकारे घसरली की, ते आता प्रचंड ट्रोल होत आहेत. त्यांचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी काही वर्षे जुन्या पिठाच्या किमती आणि आजच्या किमतीची तुलना करत होते. त्याच वेळी, ते किलोऐवजी लिटर बोलले. ते म्हणाले की, पूर्वी 22 रुपये लिटरने पीठ मिळत होते, आज ते 40 रुपये लिटरने विकले जात आहे. त्यानंतर त्यांनी आपली चूक सुधारली. मात्र तोपर्यंत त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर ते प्रचंड ट्रोल होत आहेत.

हे वाचलं का?

संपूर्ण व्हिडीओ आला समोर

हा व्हिडिओ अनेक युजर्सनी शेअर केला आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही अशी पोस्ट टाकून राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सही यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्यक्षात प्रकरण असे की, भाषणादरम्यान राहुल गांधींची जीभ घसरली. यामुळे ते किलोऐवजी लिटर बोलले. नंतर, त्याचा पूर्ण व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली चूक सुधारली आहे. मात्र, सोशल मीडियावर केवळ एक भाग व्हायरल करून राहुल गांधींना चिमटे काढले जात आहेत.

ADVERTISEMENT

भाजपचे शहेजाद पुनावाला यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर राहुल गांधी महागाईवर तितकेच गंभीर आहेत जितकी काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि हिटलर मानवी हक्कांसाठी होता, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे. युपीएच्या काळात डबल महागाई होती, असा दावा देखील त्यांनी केलाय.

ADVERTISEMENT

तर पुनावाला यांच्या ट्विटमध्ये एका युजरने पूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. आणि पूर्ण व्हिडीओ शेअर करावा, अशी विनंती देखील केली आहे.

वाढती महागाई आणि बेरोजगारीवरून आज काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढली. ‘महागाई पर हल्ला बोल’ असे या रॅलीचे नाव होते. या रॅलीवेळी झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी बोलत होते.

देशात द्वेष वाढत आहे : राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, जो घाबरतो त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो. भारतात द्वेष वाढत आहे. भारतात भीती वाढत आहे. देशाचं भविष्य भीतीच्या सावटाखाली आहे. महागाई, बेरोजगारीची भीती वाढत आहे. द्वेषाने देश कमकुवत होतोय. भाजप आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करून जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण करत आहेत. ते लोकांना घाबरवतात आणि द्वेष निर्माण करतात.

आज उभे राहिलो नाही तर देश वाचणार नाही : राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणी उभे राहिले तर त्याच्या विरोधात आक्रमण होते. देशातील सर्व यंत्रणा दबावाखाली आहेत. विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. ईडी, सीबीआय सगळे पाठीमागे लागतात. माझी ५५ तास चौकशी झाली. पण मला काही फरक पडत नाही. १०० तास चौकशी करा. मात्र आज उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सभेला संबोधित केले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT