Sanjay Raut: ‘मनसेच्या वाटेला जाण्याइतकं त्यांचा पक्ष..’, खोचक प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘आमच्या वाट्याला जायचं नाही.. बघा मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं ना..’ असं खोचक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (9 मार्च) ठाण्यात आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यातील आयोजित कार्यक्रमात केलं. ज्याला आता शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ कोणी कोणाच्या वाटेला गेलं नाही.. त्यांच्या वाटेला जाण्याइतकं काही त्यांचा पक्ष मोठा नाही. आणि ईडी काय आहे.. हे मी काय मनसे प्रमुखांना सांगायला नको.. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे.’ असं म्हणत संजय राऊत यांनी देखील राज ठाकरेंना बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. (raj thackeray party is not big enough a blunt reply from sanjay raut)

ADVERTISEMENT

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

‘कोणी कोणाच्या वाटेला गेलं नाही.. त्यांच्या वाटेला जाण्याइतकं काही त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार किंवा मुख्यमंत्री पद का गेलं हे संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यांना जर माहीत नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे.’

‘महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचं गैरवापर करून पाडण्यात आलं आहे. जोडीला खोके.. ईडी काय आहे.. हे मी काय मनसे प्रमुखांना सांगायला नको.. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त ईडीचा अनुभव आमच्यासारख्या लोकांनी घेऊन सुद्धा आमच्या तोफा आणि आमच्या पक्षाचं कार्य सुरू आहे.’

‘शिवसेनेने कधीही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि कधीही सोडणार नाही. कोण काय बोलतं यावरून शिवसेनेची भूमिका ठरत नाही. शिवसेनेने नेहमी महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व हे दोन्ही विषय आपल्यासोबत ठेवले आणि या विषयावर शिवसेनेने कधीही तडजोड केली. हे सगळ्यांना माहिती आहे.’ असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

ठाण्यातून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं…

‘भोंग्यांचा आंदोलन केलं आपण.. त्यानंतर मला अयोध्याला बोलावलं.. विरोध करणारे कोण.. हिंदुत्ववादीच.. मला ते कळलं होतं आतलं राजकारण काय आहे ते समजलं होतं. म्हणून मी त्यावेळी सांगितलं की, आता नको..’

MNS Anniversary: राज ठाकरे म्हणाले, ‘आपण सत्तेत असणार म्हणजे असणार..’

ADVERTISEMENT

‘ज्यांनी हे केलं त्यांचं पुढं काय झालं.. मग.. हे असंच असतं.. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी.. ह्या भोंग्याच्या विरोधात आंदोलन झालं तेव्हा मनसैनिकांवर हजारो केसेस टाकल्या गेल्या. बोललो ना.. वाट्याला जायचं नाही.. मुख्यमंत्रिपदावरून जावं लागलं..’ असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं. ज्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता याबाबत मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

MNS वर्धापनदिन : ठाण्यातून राज ठाकरेंचे कोणावर वार?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT