Raj Thackeray यांनी सांगितली पहिल्या भाषणाची आठवण, गर्दीसमोर बोलल्यानंतर मी घरी जाऊन…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात कार्यक्रमा निमित्त आले असताना.राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाचा किस्सा उपस्थितांना सांगताना म्हणाले की, ‘1992 साली संपूर्ण शिवतीर्थ भरले होते. मी बाळासाहेबांच्या बाजूला बसलो होतो.अनेक नेते मंडळी देखील उपस्थित होते.तेवढ्यात बाळासाहेब म्हणाले,तू बोलणार आहेस ना (आम्ही आरे तुरे मध्ये बोलायचो) मी म्हटले तू काही तरी बोलू नकोस हा. नाही तर मी व्यासपीठावरून निघून जाईन. नाही नाही तु आज बोललं पाहीजे. हे सर्व आम्हा दोघांचे सुरू असताना बाळासाहेब म्हणाले, तू बोलतोस की मी जाऊन जाहीर करू, इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले.त्यानंतर घरी आल्यावर मी पहिला लेंगा चेक केला,असे राज ठाकरे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजून दाद दिली.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात शिवशाहीर करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या अंतिम सोहोळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे,माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हे वाचलं का?

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, दुपारचे दोन वाजले आहेत. सकाळपासून ही वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या पोटात बहुदा वक्तृत्व वक्तृत्व असे आवाज येत असतील.पण आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त शहरातील स्थानिक नेत्यांनी स्पर्धा घेण्याचे ठरविले गेले.त्याचा आज कार्यक्रम होत आहे. बाबासाहेब म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच, त्या पार्श्वभूमीवर शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन, वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली आहे. त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते तयार होणे आज महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार पाच जणांची भाषणे ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो.

असे म्हणताच राज ठाकरे यांनी हात करीत म्हणाले की,ती चिमणी कुठे गेली.मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला.भीती वाटायची,बोलायला भीती वाटायची. लोकां समोर जायचं कसं बोलायाचे कसे आणि जे बोलू शकतात त्यांच्या बद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचे.अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच ते पुढे म्हणाले की,मी आजवर वक्ते ऐकले आहेत. घरात तर माननीय बाळासाहेब होतेच,तर मी श्रीपाद अमृत डांगे,जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी असे अनेक वक्ते मी जवळून पाहिले आणि ऐकले देखील आहेत.पण हे लहानपणापासून बघत असताना. मी काहीतरी बोलेल,अस मला कधीच वाटलं नव्हते, असे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

तसेच त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पहिल्या भाषणाचा किस्सा सांगितला,1991 किंवा 92 च्या सालातील घटना असेल तेव्हा माननीय बाळासाहेबांनी तेव्हा पाकिस्तानची टीमला भारतात येऊ देणार नाही आणि खेळू देखील देणार नाही, असे सांगितले.त्यानंतर पाकिस्तानच्या टीमने त्यांचा दौरा रद्द केला.त्यावर मी माननीय बाळासाहेबांना म्हणालो की, हा तर आपला विजय आहे. यावर आपला विजयी मेळावा करावा असे सांगितले.बाळासाहेब म्हणाले चांगली कल्पना आहे.त्यानुसार शिवतीर्थावर तयारी केली होती.संपूर्ण शिवतीर्थ भरले होते. मी बाळासाहेबांच्या बाजूला बसलो होतो.अनेक नेते मंडळी देखील उपस्थित होते.तेवढ्यात बाळासाहेब म्हणाले,तू बोलणार आहेस ना( आम्ही आरे तुरे मध्ये बोलायचो) मी म्हटले तू काही तरी बोलू नकोस हा. नाही तर मी व्यासपीठावरून निघून जाईल.नाही नाही तु आज बोलल पाहीजे. हे सर्व आम्हा दोघांचे सुरू असताना बाळासाहेब म्हणाले,तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू,इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले.त्यानंतर घरी आल्यावर मी पहिला लेंगा चेक केला,असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजून दाद दिली.

राज ठाकरे म्हणाले, तोपर्यंत माझी हिंमत होत नव्हती की,पुढे जाऊन बोलायची. मी कधी बोलू शकेन आणि भाषण करू शकेल.यावर माझा कधीच विश्वास देखील नव्हता,असा पहिल्या भाषणाचा प्रसंग त्यांनी यावेळी सांगितला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT