Raj Thackeray :”विरोधात असतील तरीही अजित पवारांचं कौतुक करायला हवं”

मुंबई तक

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे दोघे स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा दोघांना आपण एकमेकांवर टीका करताना पाहिलं आहे. एकमेकांचे केलेल्या नकलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. मात्र, यंदा तसं झालं नाही. राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं. झी २४ तास या वृतवाहिनीतील मुलाखतीत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे दोघे स्पष्ट आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा दोघांना आपण एकमेकांवर टीका करताना पाहिलं आहे. एकमेकांचे केलेल्या नकलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. मात्र, यंदा तसं झालं नाही. राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं. झी २४ तास या वृतवाहिनीतील मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये चांगले काम केले असल्याचे बोलून दाखवले.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

सत्ता आणि अर्थकारणासाठी जे लोकप्रतिनिधी जनतेला गृहित धरतात त्यांना मतपेटीतून लोकांनी शासन करायला पाहिजे, असं महत्वपूर्ण वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. नाहीतर ही मंडळी पुन्हा निवडूण येतात आणि आपण केलेल्या ज्या चुका आहेत त्या त्यांना बरोबर वाटायला लागतात, त्यामुळे जनता जनार्धन शासन करत नाही, असंच आतापर्यंत दिसून आलं आहे. उलट ज्यांनी कामं केली त्यांना जनता शासन करते, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

‘जनता काम करणाऱ्यांना शिक्षा देते’- राज ठाकरे

यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आम्ही नाशिकमध्ये सत्तेत असताना कामं केली, मात्र आम्हाला जनतेनी शासन केलं. तुम्ही कितीही मना, मतभेद असू दे परंतू, अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये कामं केली. पण, अजित पवारांची तिथून सत्ता गेली. म्हणजे जो काम करतो त्याला शिक्षा देणार आणि काम करत नाही, जे सतत तुमची प्रतारणा करणार, त्याला निवडून दिलं जातं, अशी नाराजी राज यांनी मुलाखतीत बोलून दाखवली. मात्र, हे बोलताना त्यांनी अजित पवारांच्या कामाची आठवण करुन दिली.

यापूर्वी आपण अनेकवेळा आपण राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वार प्रतिवार पाहिले आहेत. अनेकवेळा व्यासपिठावरुन असो किंवा पत्रकार परिषदेतून हे दोघे एकमेकांचा समाचार घेताना आपण पाहिलं आहे. मात्र, यंदा विकासकामाच्या मुद्यावर बोलताना राज यांनी अजित पवारांचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं.

राज ठाकरे यांनी केले अनेक खुलासे

राज ठाकरे यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. सध्याच्या परिस्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या जवळच्या बडव्यांमुळे आम्हाला त्रास होत होता म्हणून आम्ही बाहेर पडलो असे कारण दिले होते. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ” नारायण राणे, छगन भुजबळ ज्यावेळी बाहेर पडले त्यांनीही अशीच टीका केली होती. आणि मी पण बाहेर पडलो याच कारणाने, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे बडवे तेच आहेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp