राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी या निर्णयाला मंजुरी दिल्याचं पत्र काँग्रेसतर्फे ट्विट करण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र त्यांना राज्यसभेचं तिकिट नाकारलं गेलं. त्यावेळी त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकिट देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे.

शरद रणपिसे यांच्या निधानाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसमधून अनेक जण स्पर्धेत होते. काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचेही नाव विधान परिषदेच्या स्पर्धेत होते. मात्र, काँग्रेसने दिलेला शब्द पाळत प्रज्ञा सातव यांना उमदेवारी जाहीर केली आहे.

हे वाचलं का?

राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यता आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती.

ADVERTISEMENT

कोरोनाची लागण झाल्याने राजीव सातव यांना तब्बल 23 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. राजीव सातव यांना 19 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. 22 एप्रिलला त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

ADVERTISEMENT

त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 25 एप्रिलला त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील जहाँगीर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधीले आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. तसेच तेव्हापासून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सर्व उपचार करण्यात येत होते. त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT