Rajeshwar Singh: ED च्या अधिकाऱ्याने नोकरीचा दिला राजीनामा, 24 तासात BJP कडून मिळालं आमदारकीचं तिकिट
लखनऊ: उत्तर प्रदेशात भाजप आपले सर्व उमेदवार बऱ्याच विचारांती उभे करत आहे. असेच एक उमेदवार आहेत राजेश्वर सिंग. जे आता सरोजिनी नगर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणार आहेत. ईडीचे सहसंचालक असलेले राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 24 तासांच्या आत त्यांना भाजपकडून उमेदवारी देखील घोषित करण्यात आली. आता त्यांचे भाजपमध्ये जाणे आणि […]
ADVERTISEMENT

लखनऊ: उत्तर प्रदेशात भाजप आपले सर्व उमेदवार बऱ्याच विचारांती उभे करत आहे. असेच एक उमेदवार आहेत राजेश्वर सिंग. जे आता सरोजिनी नगर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणार आहेत. ईडीचे सहसंचालक असलेले राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 24 तासांच्या आत त्यांना भाजपकडून उमेदवारी देखील घोषित करण्यात आली.
आता त्यांचे भाजपमध्ये जाणे आणि त्यांना तात्काळ तिकिट मिळणं हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. पण आजवर त्यांची जी कारकीर्द राहिली आहे त्यामुळे त्यांचे अनेक राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण झाले आहेत. ज्या प्रकरणांमध्ये किंवा तपासात ते सक्रिय होते त्यामुळे त्यांच्या हितशत्रूंची यादी खूपच मोठी आहे. अशा परिस्थितीत त्यांचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा नेमका प्रवास कसा होता हे देखील आपण पाहणार आहोत.
एन्काउंटर स्पेशालिस्ट…
राजेश्वर सिंह हे 1996 च्या बॅचचे पीपीएस अधिकारी आहेत. जेव्हा लखनऊचे डेप्युटी एसपी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती तेव्हा सर्वजण त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट या नावाने ओळखत होते. त्याच्या नावावर एकूण 13 एन्काउंटर आहेत. ज्यामध्ये त्याने अनेक खतरनाक गुन्हेगारांशी दोन हात केले होते आणि त्यांना तुरुंगात पाठवलं होतं.