Rajya sabha Election 2022 : दोन मुद्द्यांमुळे भाजपच्या यादीची मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा
राज्यात आणि देशात सगळ्याचं लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे लागलं आहे. आपापले उमेदवार विजयी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आकड्यांची जुळवा जुळव सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्रात आणि देशात भाजपने राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या निवडीवर चर्चेनं डोकं वर काढलं आहे. राज्यसभेच्या रिक्त झालेल्या आणि होणाऱ्या जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने २२ जागांसाठी उमेदवार जाहीर […]
ADVERTISEMENT

राज्यात आणि देशात सगळ्याचं लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे लागलं आहे. आपापले उमेदवार विजयी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आकड्यांची जुळवा जुळव सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्रात आणि देशात भाजपने राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या निवडीवर चर्चेनं डोकं वर काढलं आहे.
राज्यसभेच्या रिक्त झालेल्या आणि होणाऱ्या जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने २२ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने महाराष्ट्रात दोन जागा जिंकून येण्याचं संख्याबळ असताना तिसऱ्या जागेवरही उमेदवार दिला आहे.
महाराष्ट्रातील उमेदवार निवडीची का होतेय चर्चा?
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने तीन उमेदवार उतरवले आहेत. यात भाजपने केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी खासदार धनंजय महाडिक आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी दिलीये.