राज्यसभा निवडणूक: आमदार आव्हाड-ठाकूर-कांदे खरंच चुकले?, भाजप म्हणतं हो-हो!
मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत एक मोठी घडामोड घडली आहे. खरं तर वेळेआधीच विधानसभेच्या आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान पार पाडलं होतं. त्यामुळे वेळेत मतमोजणी सुरु होईल असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद करावी अशी मागणी भाजपने अतिशय आग्रहाने लावून धरली आहे. आता हे तीन आमदार कोण आणि भाजपचा नेमका दावा काय […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत एक मोठी घडामोड घडली आहे. खरं तर वेळेआधीच विधानसभेच्या आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान पार पाडलं होतं. त्यामुळे वेळेत मतमोजणी सुरु होईल असा सगळ्यांचा अंदाज होता. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद करावी अशी मागणी भाजपने अतिशय आग्रहाने लावून धरली आहे. आता हे तीन आमदार कोण आणि भाजपचा नेमका दावा काय हे आपण जाणून घेऊया सविस्तरपणे.
राज्यसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडली त्यामुळे त्यांचं मत बाद ठरवावं असा दावा भाजपने केला आहे.
दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे हे विधानभवनात मतदान करताना नेमके कुठे चुकले याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत भाजपने नेमका काय दावा केला आहे ते आपण पाहूयात.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं बाद का ठरविण्यात याविषयी भाजपचा काय दावा आहे स्पष्ट केलं.